ओबीसी आरक्षण : उद्धव ठाकरे यांची संयत प्रतिक्रिया... मी मुख्यमंत्री नसलो तरी...

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील निवडणुका ओबीसी आरक्षणासह (OBC Reservation) घेण्यास मान्यता दिली आहे
Uddhav Thackeray latest marathi News
Uddhav Thackeray latest marathi NewsSarkarnama

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय (OBC Reservation) आरक्षणासह निवडणुका घेण्याचा आदेश आज दिले. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. यावर माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Uddhav Thackeray latest marathi News)

उद्धव ठाकरे म्हणाले, आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ओबीसी समाजाला न्याय मिळाला याचे समाधान आहे. ही श्रेय घेण्याची लढाई अजिबात नाही, कारण सर्वसामान्य जनतेच्या, विशेषत: दुर्बल समाजाच्या भल्यासाठी काम करणे हे कुठल्याही सरकारचे कर्तव्यच असते आणि म्हणूनच ओबीसी आरक्षणासाठी अगदी पहिल्यापासून महाविकास आघडीतले आम्ही सर्व पक्ष मनापासून प्रयत्न करीत होतो.

Uddhav Thackeray latest marathi News
पद देताना पैश्यांपेक्षा निष्ठाही बघा : अडगळीतील शिवसैनिकांचा ठाकरेंना सल्ला

हा तिढा अवघड होता. पण तो सोडविण्यासाठी आम्ही त्यावेळेस विरोधी पक्ष, संघटना या सर्वांशी वारंवार चर्चा करून त्यांनाही विश्वासात घेतले होते. जयंत बांठीया यांच्यासारखा अनुभवी वरिष्ठ अधिकारी आणि त्यांची टीम यांनी हे शिवधनुष्य पेलले त्याबद्द्ल त्यांनाही जितके धन्यवाद द्यावे तितके कमीच आहेत. यामध्ये आयोगाचे सर्व सदस्य तर अतिशय मेहनतीने काम करीत होतेच, शिवाय राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेतील सर्व घटकांनी देखील सर्वतोपरी प्रयत्न केले.

खरे तर सगळ्यांनीच ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे यावर लक्ष्य केंद्रीत करून एक चांगला लढा दिला. त्यामुळे महाराष्ट्राने केलेल्या प्रयत्नांना यश आले. मी आज मुख्यमंत्री नसलो तरी आमच्या काळात यावर सर्वानुमते जी पाऊले उचलण्यात आली होती, तिला यश मिळाले यासारखे समाधान नाही, अशी संयत प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Uddhav Thackeray latest marathi News
अमित शहांनी अधिकाऱ्यांना पाठवले शरद पवारांकडे....

दरम्यान, या निकालानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ओबीसी राजकीय आरक्षणाचा महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला असल्याचे सांगत पहिली प्रतिक्रिया दिली. न्यायालयाच्या निकालानंतर ट्विट करुन फडणवीस म्हणाले, ओबीसी राजकीय आरक्षणाचा आमच्या महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला! सर्वोच्च न्यायालयातून ओबीसी राजकीय आरक्षणाला मान्यता मिळणे हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय आहे. ओबीसी कल्याण, बहुजन कल्याण, गरिब कल्याण हाच आमचा अजेंडा होता, आहे आणि राहील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in