शिवसेनेचा इतर कोणी मुख्यमंत्री होणार असेल तर आनंदच आहे!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे बंडखोर आमदारांना भावनीक आवाहन
शिवसेनेचा इतर कोणी मुख्यमंत्री होणार असेल तर आनंदच आहे!
CM Uddhav Thackeray sarkarnama

मुंबई : शिवसेनेचे (ShivSena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाष्य केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ही बाळासाहेबांची शिवसेना नाही, अशी बातमी पसरविण्यात आली. २०१४ ला एकट्याच्या ताकदीवर ६३ आमदार शिवसेनेचे निवडून आले ती पण हिंदुत्वावर. शिवसेना कुणाची बाळासाहेबांची पण मधल्या काळात जे मिळाले ते याच शिवसेनेने मिळवले, असे ते म्हणाले. (Uddhav Thackeray Latest Marathi News)

या वेळी ते म्हणाले, धक्का हो धक्का. सत्तेसाठी एकत्र आलो. सकाळी कमलनाथ आणि शरद पवारांचा (Sharad Pawar) फोन आला. त्यांनी सांगितले आम्ही तुमच्या सोबत आहेत. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही. तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको तर मी पद सोडायला तयार. आज मी वर्षावरील मुक्काम हलवतोय. पण हे समोर येऊन बोला. तसेच शिवसेनेचा दुसरा कोणी मुख्यमंत्री होणार असेल तर आनंदच आहे, असेही ते म्हणाले.

CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray live : मुख्यमंत्रीपद सोडायला तयार; फक्त समोर येवून सांगा!

कुऱ्हाडीची गोष्ट सांगत मुख्यमंत्री म्हणाले, ज्याने घाव घातल्या जाताहेत त्याच्या वेदना अधिक. शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका. मला कोविड झालाय मी राजीनामा देतो तुम्ही येऊन घेऊन जा. हे काय मोठे आव्हान आहे. शिवसैनिक सोबत तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन. शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. संकाटाला सामोरा जाणारा शिवसैनिक आहे.

CM Uddhav Thackeray
लोकांचा लोकनाथ एकनाथ... डोंबिवलीत शिंदेना पाठिंबा दर्शविणारे बॅनर

एकदा ठरवू या समोर या सांगा आम्हाला संकोच वाटतोय हे स्पष्ट सांगा. मी पद सोडायला तयार. आयुष्याची कमाई पद नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई. माझे हे नाटक नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in