'' ठाकरेंची आंबेडकरांशी युती म्हणजे डूबते को तिनके का सहारा..''; शिंदे गटाची बोचरी टीका

उबाठा सेनेची नौका आता बुडायला लागली आहे....
Prakash Ambedkar, Uddhav Thackeray News
Prakash Ambedkar, Uddhav Thackeray NewsSarkarnama

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. यानंतर राज्यात भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता वंचितकडून ठाकरे गटाशी युती करण्याविषयी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, या युतीवरुन शिंदे गटाने ठाकरे गटावर बोचरी टीका केली आहे.

चिखली येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपवर टीकेची झोड उठवली होती. ठाकरेंच्या टीकेचा घाव भाजप आणि शिंदे गटाच्या चांगलाच वर्मी लागल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून ठाकरेंना लक्ष्य करण्यात येत आहे. यातच आता शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी देखील ठाकरेंवर पलटवार केला आहे. (MP Prataprao Jadhav News)

Prakash Ambedkar, Uddhav Thackeray News
Tukaram Munde : डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे पाहणार शिर्डी साई संस्थानचा कारभार
Prakash Ambedkar, Uddhav Thackeray News
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ठाकरेंची फिल्डिंग; भाजप आमदाराच्या भावालाच दिली मोठी जबाबदारी

जाधव म्हणाले, उबाठा सेनेची नौका आता बुडायला लागली आहे. डूबते को तिनके का सहारा अशी उध्दव ठाकरेंची अवस्था आहे. याचमुळे त्यांच्याकडून आघाडी, युतीसाठी केविलवाणी धडपड सुरु आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी नंतर आता वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याची धडपड सुरु केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com