Uddhav Thackeray.. : तुमच्या मानेवर वसुलीची सुरी फिरवू, मिंधे सरकारचा दुतोंडी कारभार ; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray : खोके सरकार त्याचे प्रायश्चित घेणार का ?
Uddhav Thackeray, Cm Eknath Shinde News
Uddhav Thackeray, Cm Eknath Shinde NewsSarkarnama

Uddhav Thackeray News : नगर जिल्हय़ातील अकोळनेर येथील शेतकरी पोपट आबाजी जाधव यांनी सोमवारी गळफास लावून आत्महत्या केली. 'सरकार त्याच्यावर ही वेळ का आणली ? या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत,' असा सवाल उद्धव ठाकरे यांनी बुधवारी 'सामना'तून शिंदे-फडणवीस यांना केला आहे.

"राज्यात खोके सरकार आल्यापासून महाराष्ट्राची सर्व बाबतीत घसरण सुरु आहे. राज्यकर्ते कितीही 'सकारात्मक'वगैर वातावरणाचे दावे करीत असले तरी राज्यात त्याच्या विपरीत घडत आहे, शेतकरी आधी अतिवृष्टी आणि महापुराच्या तडाख्यात सापडला होता, आता तो मिंधे सरकारच्या तावडीत सापडला आहे, पोपट जाधव यांची आत्महत्या ही महावितरण नावाच्या 'पठाणी टोळी'ने घेतलेला बळी आहे. खोके सरकार त्याचे प्रायश्चित घेणार का," असा प्रश्न अग्रलेखात विचारण्यात आला आहे.

Uddhav Thackeray, Cm Eknath Shinde News
Jitendra Awhad : आव्हाडांना विनयभंगाचा गुन्ह्यात अडकविण्यात मनसेच्या बड्या नेत्याचा हात ?

"खरीपाचे पीक महापुरामुळे उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्याने मोठय़ा उमेदीने रब्बीचा हंगाम फुलविला आहे. मात्र महावितरण नावाची ‘टोळधाड’ रब्बीचे पीकही उद्ध्वस्त करीत आहे. सरकार म्हणते, ‘फुकाच्या गप्पा मारीत नाही. वीज बिल थकबाकीसाठी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणार नाही.’ महावितरण म्हणते, ‘वीज बिल भरा, नाहीतर तुमच्या मानेवर वसुलीची सुरी फिरवू.’ मिंधे सरकारचा दुतोंडी कारभार हा असा सुरू आहे”, असे अग्रलेखात म्हटलं आहे.

Uddhav Thackeray, Cm Eknath Shinde News
The Kashmir Files वर नवी ठिणगी ; राजकीय अजेंड्यासाठी वापर..; दोन मराठमोळ्या अभिनेत्रींमध्ये जुंपली

या कारभाराच्या कचाटय़ात सापडलेल्या बळीराजाने जगायचे कसे? नगर जिल्हय़ातील पोपट जाधव या शेतकऱ्याची आत्महत्या ही महावितरण नावाच्या ‘पठाणी टोळी’ने घेतलेला बळी आहे. खोके सरकार त्याचे प्रायश्चित्त घेणार का, हाच प्रश्न आहे”, असा खडा सवाल ठाकरेंनी विचारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in