पुनश्च "उठा" ! सोशल मीडियावरील त्या बॅनरची एकच चर्चा

Shivsena|Uddhav Thackeray| महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज (27 जुलै) 62 वा वाढदिवस आहे.
Shivsena|Uddhav Thackeray|
Shivsena|Uddhav Thackeray|

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशानुसार कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदी माजी आमदार सुभाष भोईर यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी कल्याण लोकसभा मतदार संघ पिजून काढत शिवसैनिकांना (Shivsena) आधार दिला आहे. ठाणे जिल्ह्यात आता शिवसेनेचे नेते म्हणून सुभाष भोईर यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यातच आता भोईर यांचा पुनश्च "उठा" असा संदेश असलेला बॅनर सोशल माध्यमातून चांगलाच व्हायरल व्ह्यायला लागला आहे. विशेष म्हणजे बॅनरवर लोकनेते स्व.दीबा पाटील यांचा फोटो सुद्धा आहे. त्यामुळे भूमिपुत्रामध्ये याची चर्चा होऊ लागली आहे.

काय आहे बॅनरवर...

बॅनरवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या असून पुनश्च "उठा" आपण बाळासाहेबांची सावली हिंदुहृदयसम्राटांच रक्त... सर्वसामन्यांच्या प्रेमाचे आसक्त तरीही योग्यासमान विरक्त... धीरगंभीर अन् कणखर न होई विचलित क्षणभर इतकी पातळ नाही शिवसेना तमाम हिंदू मने मनापासून आपल्याच पाठीशी आहेना. असा संदेश लिहीत पक्ष प्रमुख ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. निष्ठावान शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे या बॅनर मधून दर्शविण्यात आले आहे.

Shivsena|Uddhav Thackeray|
पराभवाचे चटके दिलेल्या जनतेनेच मला डोक्यावर घेतले!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज (27 जुलै) 62 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांसह अनेक चाहत्यांकडून राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

शिंदे गट आणि भाजप सरकार यांच्याकडून शिवसेनेवर येणाऱ्या संकटांच्या मालिका अद्यापही थांबलेल्या नाहीत. शिंदे गटालाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. पण दूसरीकडे राज्यातील काही शिवसैनिकांचा मोठा गट अद्यापही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवसानिमित्त काल रात्री ठीक बारा वाजता शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांनी मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in