उद्धव ठाकरे आजही तुमचे नेते आहेत का..? एकनाथ शिंदेंनी दिले हे उत्तर...

आम्हालाही त्याची खंत आहे. आम्हाला कुठं आनंद आहे.
Eknath Shinde -Uddhav Thackeray
Eknath Shinde -Uddhav Thackeray Sarkarnama

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबदल आजही आदर आहे. पातळी सोडून राजकारण करणारा मी कार्यकर्ता नाही. विरोधी पक्षातील नेत्यांचाही मी आजपर्यंत आदर करत आलेलाे आहे, त्यामुळे यावर मी अधिक काही बोलणं उचित होणार नाही. आवश्यकता भासल्यास योग्य वेळी काही गोष्टी स्पष्ट करता येतील, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे हे आपला आजही नेता असल्याच्या प्रश्नावर भाष्य करणे टाळले. (Uddhav Thackeray Is your leader even today ..? Answer given by Eknath Shinde ...)

मुख्यमंत्री शिंदे यांची एका वृत्तवाहिनीने मुलाखत घेतली. त्यात त्यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजही तुमचे नेते आहेत का? सा प्रश्न विचारण्यात आला हेाता. त्यावेळी त्यांनी वरील उत्तर दिले. ते म्हणाले की त्यांच्याबद्दल मला आजही आदर आहे. पण योग्य वेळी काही गोष्टी स्पष्ट करता येतील, असे सांगून त्यावर अधिक भाष्य करणे त्यांनी टाळले.

Eknath Shinde -Uddhav Thackeray
‘शिवसेनेचे ११ खासदार भाजपच्या संपर्कात’; ‘मातोश्री’वरील बैठकीस तिघांची दांडी

शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी माझे ट्विटरवरून अभिनंदन केले आहे, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्याबद्दल आजही मला आदर आहे. त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला, त्याच्यामुळे आम्हाला आनंद झाला, असे मानण्याचे काही कारण नाही.

Eknath Shinde -Uddhav Thackeray
पांडूरंगाची पूजा `एकनाथ`च करणार, पण परतल्यावर सरकार राहील का?

बाळासाहेबांच्या मुलाला मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचले, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. त्यावर बोलताना शिंदे यांनी म्हणाले की, आम्हालाही त्याची खंत आहे. आम्हाला कुठं आनंद आहे. पण मित्रपक्ष, नैसर्गिक मित्र, ज्यांच्यारोबरच आपण निवडणुका लढवल्या, त्यांच्यारोबर आपण कामकाज केले पाहिजे. अशी माझ्यासह ४० ते ५० आमदारांची भूमिका होती. भाजपबरोबर जाण्यासाठी आम्ही प्रयत्न खूप केले. मात्र त्यात आम्हाला यश आले नाही.

Eknath Shinde -Uddhav Thackeray
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधीमंडळाच्या कामकाजापासून रोखा!

उद्धव ठाकरेंच्या चर्चेच्या आव्हानावर शिंदे स्पष्टपणे बोलले. ते म्हणाले की, महाविकास आघाडीत असतानाही यापूर्वी आमची अनेकदा चर्चा झाली. मला काय पाहिजे, अशी भूमिका नव्हती. पण, पक्षाचे २० ते २५ आमदार आपल्या अस्तित्वासाठी लढा देतात, त्यावेळी त्यांच्या भावनेचा विचार करण्याची गरज आहे. मी आणि उद्धव ठाकरे यांनी खूप प्रयत्न केले. मात्र, त्यात आम्हाला यश आले नाही.

Eknath Shinde -Uddhav Thackeray
मोदींच्या मंत्रिमंडळात शिंदे गटाला संधी ? ; अधिवेशनापूर्वी फेरबदल, मंत्रीपद मिळणार

आम्ही कोणतेही बेकायदेशीर काम केलेले नाही. ज्यांच्याबरोबर युती करून निवडणूक लढवली, त्यांच्यासोबत जनतेचा गाडा हाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. व्हीपबाबत बोलताना ते म्हणाले की, लोकशाहीत कायद्याला, नियमाला महत्व आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली आहे, त्यामुळे विधानसभेत आम्ही बहुमत सिद्ध करू. कारण आमच्याकडे आकडे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com