Uddhav Thackeray : शिंदे उद्या मोदींचे पंतप्रधानपदही मागतील ; भाजपवाल्यांनो, सावधान !

Uddhav Thackeray |मी मुख्यमंत्री झालो तर प्रॉब्लेम काय तुम्हाला?
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (बुधवार) 'सामना'मधील मुलाखतीच्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (eknath shinde) टीकेचे बाण सोडले. ठाकरे म्हणाले, "शिंदेंनी अत्यंत वाईट पद्धतीने मुख्यमंत्रीपद मिळवले आहे. आता तर ते शिवसेनाप्रमुखांबरोबर तुलना करायला लागले," (Uddhav Thackeray latest news)

ठाकरे म्हणाले, 'ही आमची शिवसेना' म्हणून ते दावा करीत आहेत. हा अत्यंत घाणेरडा, दळभद्री प्रकार आहे. हे बघितल्यानंतर मला नाही वाटत, भाजप त्यांना कधी पुढे करील. नाही तर नंतर ते नरेंद्र भाईंशी तुलना करतील स्वतःची आणि पंतप्रधान पद मागतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते ना! ही चटक आहे,"

"भाजप किती भयंकर म्हणून त्यांनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ती क्लिप फिरतेय. भाजप कसा शिवसैनिकांवर अन्याय-अत्याचार करतो ही ती क्लिप आहे. माझ्याच समोर त्यांनी तो राजीनामा दिला होता," असे ठाकरे यांनी सांगितले होते.

"मी मुख्यमंत्री झालो तर प्रॉब्लेम काय तुम्हाला? तुम्ही ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता, त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवले? का तर म्हणे हिंदुत्व वगैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी नको. मला एका गोष्टीचं समाधान आहे. मी पण अडीच वर्षं मुख्यमंत्री होतो, पण मला सत्तेची चटक लागली नाही. तो सत्तापिपासूपणा रक्तात भिनला की तुम्ही कोणाचे नसता आणि कुणी तुमचं नसतं तेच त्यांचं आज झालं आहे," असे ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Shiv sena : शरद पवारांनी शिवसेना फोडली का ? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर..

उपरवालेकी मेहरबानी..

फडणवीसांसोबत भाजप अशी का वागली? असा प्रश्न राऊतांनी ठाकरेंना विचारला. त्याला ठाकरेंनी खोचकपद्धतीने उत्तर दिले. 'फडणवीस उपमुख्यमंत्री झाले ही उपरवालेची मेहरबानी,' अशा शब्दात ठाकरेंनी टोला लगावला. फडणवीसांबाबत भाजप अशी का वागवी, हे कळालं नाही, असे ठाकरे म्हणाले.

विश्वासघातकी शिंदें..

ठाकरेंनी यावेळी एकनाथ शिंदे गट, भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र डागले.ते म्हणाले, "

शिंदेच्या रक्तात सत्तापिपासूपणा आहे. विश्वासघातकी शिंदेंना मुख्यमंत्री व्हायच होतं.शिवसैनिकांच्या अश्रूंची किंमत शिंदेंना मोजावी लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com