Old Pension Scheme : महाशक्ती सोबत आहे तर पंचामृताचे काही थेंब कर्मचाऱ्यांवर उडवायला हरकत काय? ठाकरेंचा सवाल!

Maharashtra Assembly : "सोबत महाशक्ती असेल तर..."
Old Pension Scheme : Uddhav Thackeray
Old Pension Scheme : Uddhav Thackeray Sarkarnama

Uddhav Thackeray : किसान सभेच्या मोर्चात आता वेगळा ट्वि्स्ट आला आहे. किसान मोर्चा शिष्टमंडळ मुंबईत रवाना होणार नाही तर आता मुख्यमंत्री आणि सरकारमधील मंत्र्यांनीच आमच्याकडे बोलणीसाठी यावे, अशी ठाम भूमिका मोर्चाने घेतली आहे. यावरूनच आता ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे.

Old Pension Scheme : Uddhav Thackeray
Kisan Morcha Long march News : मोर्चेकऱ्यांशी गिरीश महाजन चर्चा करायला जाणार, तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू.

उद्धव ठाकरे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, "किसान मोर्चा हा यापूर्वी ही आला होता, यासाठी शिवसेना सामोरे गेली होती. त्यांची विचारपूस केली होती. एक माणुसकी असायला पाहिजे. अन्नदाता हा आक्रोश करतोय. सरकारकडे यांच्याकडे पाहण्यासाठी वेळ नाही. मोर्चेकरांशी बोलून त्यांचं समाधान करायला पाहिजे. सरकारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्याच्या मागण्यांना आम्ही पाठिंबा दिला आहे. सरकारकडे महाशक्ती असल्यानंतर जुन्या पेंशनचं वजन पेलायला हरकत नसावी. संपकऱ्यांचे काही नेते मला भेटले. त्यांचं म्हणणं एकायचं कोणी? त्यांच्यासमोर तुम्ही प्रश्नांचे डोंगर उभे करणार असाल तर मग प्रशासन काय करतंय?"

Old Pension Scheme : Uddhav Thackeray
Parliament Session Live : अदानींच्या विरोधात राऊत आज पुरावे देणार

ठाकरे पुढे म्हणाले, "अर्थसंकल्पाला गोड नाव दिलं पंचामृत. पंचामृत म्हणजे हातावर पळी टेकवलं जातं. पोटं भरलं जात नाही. पंचामृत या शब्दाचा अर्थ असा आहे की, कोणाला आम्ही पोटभर देणार नाही. हा विचित्र अर्थसंकल्प त्यांनी आणलेला आहे. पंचामृताचे काही थेंब सरकारी कर्मचाऱ्यावर उडवण्यास काहीच हरकत नव्हती. त्यांना तुम्ही झिडकारून टाकत असाल तर ते योग्य नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in