Uddhav Thackeray : राज्यातील कायदेतज्ञांची ठाकरेंनी मातोश्रीवर घेतली बैठक; पुढील रणनीती तयार?

Shivsena News : वकिलांची मुंबईत बैठक अन् ठाकरेंच्या गोटात घडामोडींना वेग
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Maharashtra Politics : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निकाल दिला. त्यानंतर मात्र, राज्यात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. शिवसेना आणि धनुष्यबाण गमावल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ॲक्शन मोडवर आले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी आज काही वकिलांची मुंबईत बैठक बोलावली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक होती, असं सांगण्यात येत आहे.

Uddhav Thackeray
NCP Leader Join shiv Sena : शिंदेंचा इचलकरंजीत राष्ट्रवादीला धक्का; आठ वर्षांपासून मोठ्या पदावर असलेल्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

वकिलांची मुंबईत बैठक बोलाल्यामुळे ठाकरेंच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. तसेच यामध्ये कायदेतज्ञ उल्हास बापट हे देखील मातोश्रीवर पोहचले. बापट मातोश्रीवर दाखल झाल्यानेही अनेक तर्क वितर्क काढण्यात येत आहेत.

Uddhav Thackeray
Harshvardhan Jadhav : मोर्चा काढण्यापेक्षा तिजोरीच्या चाव्या फिरवा, नुकसान भरपाईचे पैसे द्या..

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या फोननंतर बापट मातोश्रीवर पोहचले. दोघांमध्ये काही तास चर्चा झाली. मात्र, काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. कायद्याच्या संदर्भात अनेक गोष्टींच्या मार्गदर्शनासाठी ठाकरेंनी मातोश्रीवर वकिलांची मुंबईत बैठक बोलावली होती, अशी माहिती मिळाली आहे.

Uddhav Thackeray
Shivsena News : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण गमावल्यांनतर ठाकरे ॲक्शन मोडवर; मोठे राजकीय पाऊल उचलले

तसेच शिवसेना (Shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला गेल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता पुढील भूमिका काय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. या पार्श्वभूमीवरच कायद्याच्या संदर्भात अनेक गोष्टींच्या मार्गदर्शनासाठी ठाकरेंनी राज्यातील काही कायदेतज्ञांची मातोश्रीवर बैठक घेतली आहे. त्यामुळे आता ठाकरेंची पुढील रणनीती काय असणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com