उद्धव ठाकरेंना राऊतांची भेट नाकारली; तुरुंगप्रशासन म्हणाले, त्यांना भेटायचे असेल तर…

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे संध्या आर्थर रोड तुरुंगामध्ये आहे.
Uddhav Thackeray, Sanjay Raut
Uddhav Thackeray, Sanjay Rautsarkarnama

Uddhav Thackeray : मुंबई : शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना भेटण्याची परवानगी मागितली होती, अशी माहिती आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे संध्या आर्थर रोड तुरुंगामध्ये आहे. त्यांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तुरुंगप्रशासनाकडे परवानगी मागितली होती.

मात्र, त्यांनी परवानगी नाकारली आहे. ईडीने राऊत यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत एक ऑगस्ट रोजी अटक केली आहे. पात्रा चाळ प्रकरणातील गैरव्यवहाराप्रकारणामध्ये राऊत यांना अटक झाली आहे. ५ सप्टेंबर रोजी राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे राऊत आता १९ सप्टेंबरपर्यंत कोठडीमध्येच असणार आहे.

Uddhav Thackeray, Sanjay Raut
Devendra Fadanvis : दसरा मेळाव्यासाठी सरकारने कुठलेही मैदान ब्लॉक केलेले नाही !

उद्धव ठाकरे यांना राऊत यांना भेटण्याची परवानगी नाकारताना तुरुंग प्रशासनाने, त्यांना भेटायचे असेल तर यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी न्यायालयाची परवानगी घ्यावी, असे सांगितले. सर्वसामान्य कैद्यांना ज्यापद्धतीने भेटायची व्यवस्था असते त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांना राऊत यांना भेटता येईल, असे तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केले. ठाकरेंनी राऊत यांना जेलरच्या रुममध्ये भेटण्यासंदर्भात परवानगी मागितली होती. मात्र, अशी विशेष परवानगी देता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. इतर सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांना भेटता येईल, असे तुरुंग प्रशासनाने सांगितले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी कोणतेही लेखी निवेदन तुरुंग प्रशासनाला दिले नाही. उद्धव ठाकरे यांच्या तर्फे एका व्यक्तीचा फोन तुरुंग प्रशासनाकडे आला होता. ठाकरेंना संजय राऊतांना पोलीस अधीक्षकांच्या रुममध्ये भेटायचे आहे सांगितले होते. मात्र, तुरुंग अधीक्षकांनी संजय राऊत यांना भेटायचे असेल तर सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे भेटावे. ही भेट घेण्यासाठीही न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल असे स्पष्ट्र करण्यात आले आहे.

Uddhav Thackeray, Sanjay Raut
Elelction | लागा तयारीला! 281 बाजार समित्यांचा निवडणूकांचे बिगुल वाजले

उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एका व्यक्तीने फोनवरुन अनौपचारिक भेटीसंदर्भात तुरुंग प्रशासनाला विचारपूस केली होती. तसेच तुरुंग अधीक्षकांच्या रुममध्ये संजय राऊत यांना भेटण्याची परवानगी द्यावी, यासंदर्भात विचारणा झाली होती. अशाप्रकारे भेट देता येणार नाही. रितसर पद्धतीने परवानगी घेऊनच भेट घेता येईल असे उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com