विधानभवनात पोचताच उद्धव ठाकरेंनी विचारले होते ‘एकनाथ कुठे आहेत?’

एरवी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला विधान भवनाच्या दारात येणारे शिंदे सोमवारी दारात नव्हे; तर ठाकरेंची बैठक होणाऱ्या हॉलमध्येही दिसले नव्हते. त्यामुळे ठाकरे यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली असावी.
Uddhav Thackeray_Eknath shinde
Uddhav Thackeray_Eknath shindeSarkarnama

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षात संघर्ष झाला; तरी शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) नजर मात्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरच होती. मतदानासाठी सोमवारी (ता. २१ जून) विधान भवनात येताच ठाकरे यांनी एकनाथ कुठे आहेत? त्यांना सांगून ठेवलयं ना? अशी विचारणा खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि अनिल देसाई (Anil Desai) यांच्याकडे केली होती. एरवी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला विधान भवनाच्या दारात येणारे शिंदे सोमवारी दारात नव्हे; तर ठाकरेंची बैठक होणाऱ्या हॉलमध्येही दिसले नव्हते. त्यामुळे ठाकरे यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली असावी; म्हणूनच त्यांनी शिंदेंची चौकशी केल्याचे स्पष्ट आहे. (Uddhav Thackeray had inquiry about the absence of Eknath Shinde)

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकाळी साडेदहा वाजताच विधान भवनात पोचले होते. शिवसेनेच्या आमदारांना एकत्र बोलवून काही सूचनाही त्यांनी केल्या. त्याआधी बैठकीच्या हॉलमध्ये येत असतानाच त्यांना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कुठेही दिसले नाहीत. त्यावरून लगेचच एकनाथ कुठे आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला आणि बैठकीसाठी निघून गेले. त्यानंतर मुख्यमंत्री दुपारी सव्वादोन ते अडीचपर्यंत विधान भवनात होते. त्यादरम्यानही ठाकरे आणि शिंदे यांच्यात फारसे बोलणे झाले नव्हते. कारण, शिंदेही मतदान करून घेण्याच्या गडबडीत असल्याचे सांगण्यात येत होते.

Uddhav Thackeray_Eknath shinde
ठाकरे सरकार पडण्याची फक्त औपचारिकता बाकी : फडणवीसांच्या निकटवर्तीय आमदाराचे सूचक विधान

प्रत्यक्षात दीडपर्यंतच शिवसेनेच्या आमदारांचे मतदान झाले होते. तरीही ठाकरे आणि शिंदे यांच्यात विधान भवनात चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी दुपारी दोनच्या ठोक्याला शिंदे विधान भवनाबाहेर आले आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी मोजकेच बोलून गाडीत बसले. शिंदे नाराज असल्याचे जाणवत होते. नाराजीवर बोलतो; म्हणून शिंदे यांनी पत्रकारांचा प्रश्न पुढे ढकलला. त्यानंतर एकनाथ शिंदे समर्थक आमदारही बाहेर पडले.

Uddhav Thackeray_Eknath shinde
एकनाथ शिंदेंच्या बंडामागे अमित शहा?; दिल्लीतील बैठकीनंतर सूत्रे हलली

विधान परिषदेच्या निवडणुकीत काही मते देण्याची मागणी काँग्रेसने शिवसेनेकडे केली होती. महाविकास आघाडी सरकार म्हणून ठाकरे हे काँग्रेसला मदत करण्याच्या मनःस्थितीत होते. परंतु, काँग्रेसला मदत करण्यास शिंदे आणि त्यांच्याजवळच्या आमदारांचा मोठा विरोध होता. राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत दगाबाजी झाल्याचे सांगून शिंदे यांनी काँग्रेसच्या मदतीचा प्रस्ताव धुडकावून लावला होता. त्यावरून ठाकरे, इतर शिवसेना नेते आणि शिंदे यांच्यामध्ये मतभेद झाल्याचे उघड झाले होते. त्याचा परिणाम, या निवडणुकीत काँग्रेसचे नेते चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले. त्यामागे शिंदे यांची खेळी असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com