दुपारची झोप टाळून उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना वेळ दिला; शिंदे गटाची खोचक टीका

Uddhav Thackeray : आता पायाखालची वाळू सरकू लागल्यावर आपल्याला शिवसैनिकाची आठवण झाली.
Uddhav Thackeray, Shivsainik Latest News
Uddhav Thackeray, Shivsainik Latest NewsSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कामाच्या झपाट्यामुळे विचलित झालेल्या शिल्लक सेनेने वारंवार आम्हाला डिवचण्याचा केलेला प्रयत्न निषेधार्थ आहे, असे मत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी व्यक्त केले आहे. दादर येथे शाखाप्रमुखावर भ्याड हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्याला पोलिसांनी जामिनावर सोडल्यानंतर त्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भेटणे आणि त्याच्यासोबत फोटो काढून घेणे हे आश्चर्यकारक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले आहे. (Uddhav Thackeray, Shivsainik Latest News)

Uddhav Thackeray, Shivsainik Latest News
अरविंद सावंत अन् नवनीत राणांसारख्या निर्लज्ज राजकारण्यांचा धिक्कार; मनसेची टीका

त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे. ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या निधनानंतर 'मातोश्री'चे दरवाजे सर्वसामान्य शिवसैनिकासाठी बंद झाले होते. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील ते कधीच उघडले नाहीत. शिवसैनिकच काय मंत्री आणि आमदाराना देखील कायम तीच वागणूक मिळाली. आता पायाखालची वाळू सरकू लागल्यावर आपल्याला शिवसैनिकाची आठवण झाली. हीच आठवण अडीच वर्षांपूर्वी काढली असती तर आज ही वेळ आपल्यावर आली नसती. आज रविवारी (ता. ११ ऑगस्ट) दुपारची झोप टाळून तुम्ही तो वेळ सर्वसामान्य शिवसैनिकाला दिलात हे निश्चितच चांगले आहे. मात्र एका आरोपीला शिवसैनिकावर हात उगरल्याबद्दल 'मातोश्री'वर बोलावून त्यांच्यासोबत फोटो काढून घेणे निश्चितच भूषणावह नसल्याचे मत म्हस्केंनी व्यक्त केले आहे.

Uddhav Thackeray, Shivsainik Latest News
पृथ्वीराजबाबांचा राहुल गांधींना कधीच विरोध नव्हता, 'ते' वृत्त म्हणजे खोडसाळपणा

दरम्यान, प्रभादेवी येथे ठाकरे आणि शिंदे गटातील शिवसैनिक आपापसात भिडले होते. यानंतर ठाकरे गटाचे शाखाप्रमुख महेश सावंत यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी 'मातोश्री'वर जावून ठाकरेंची भेट घेतली. यावेळ सावंत आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले. यावेळी बोलताना शिवसैनिक हाच शिवसेनेचा ब्रह्मास्त्र आहे, असे कौतुकाचे बोल उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवल्याचे समजते. यावर शिंदे गटाकडून आता प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com