Uddhav Thackeray : वापरा आणि फेका नीती भाजपला कसब्यात भोवली; ठाकरेंचा हल्लाबोल

Kasba Peth By Election Result : ''कसबा पोटनिवणूक महाविकास आघाडी जिंकली याचा आनंद...''
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Mumbai : कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासीक विजय झाला. धंगेकर यांनी ११ हजार मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.

रवींद्र धंगेकर यांचा विजय झाल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवरच उद्धव ठाकरे यांनी भाजपला कसब्यात वापरा आणि फेका ही निती भोवली आहे, असा घणाघात माध्यमांशी बोलताना केला.

Uddhav Thackeray
Eknath Shinde News : मी अजितदादांना देशद्रोही म्हणालो नव्हतो, मलिकांचा देशद्रोह्यांशी संबंध, ते बोलणारच..

ठाकरे म्हणाले, ''पदवीधर निवडणुकीचे निकाल आणि कसब्याचा लागलेला निकाल हेच येणाऱ्या काळातील बदलाच्या आशेचं किरण आहे. वापरा आणि फेका ही निती भाजपला कसब्यात भोवली आहे. भारतीय जनता पक्ष किती घातक आहे हे आपण पाहायला हवं''.

''कारण टिळकांच्या घराण्याबरोबर भाजपने काय केलं? तसेच गिरीश बापट हे आजारी असतानाही त्यांना प्रचारात उतरवलं. हिच परिस्थिती आपल्याला मनोहर पर्रीकर यांच्याशी घडली होती. त्यांनाही आजारी असताना प्रचारात उतरवलं होतं. आता त्यांच्या मुलाला भाजपने बाजूला केलं. त्यामुळे भाजपची ही निती धोकादायक आहे'', असा घणाघात ठाकरेंनी केला.

Uddhav Thackeray
Who is Dhangekar? असे विचारणाऱ्या चंद्रकांतदादांना दाखवून दिलं.. Dhangekar is now...."

कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला. त्यामुळे या विजयाचा आनंदच आहे. मात्र, चिंचवडमध्ये आम्हाला जी फुटलेली मते आहेत ती मते एकत्र करण्यासाठी आमच्यासमोर आव्हान आहे. त्यामुळे मतामध्ये फूट होऊ न देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत'', असं ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com