उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येणार? शिवसेना नेत्याच्या ट्विटने खळबळ

Uddhav Thackeray| Eknath Shinde| उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र यावं ही सर्वांची इच्छा
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येणार? शिवसेना नेत्याच्या ट्विटने खळबळ

मुंबई : शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये दोघे पुन्हा एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येणार का, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. महत्वाची बाब म्हणजे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे चर्चेसाठी एकत्र येण्यासाठी भाजप नेत्यांनीच मध्यस्ती केल्याचेही सांगत दिपाली सय्यद यांनी भाजप नेत्यांचेही आभार मानले आहे.

दिपाली सय्यद यांचं दुसरं ट्विट

दिपाली सय्यद यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, 'येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरं वाटलं. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखांची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहेत. या मध्यस्तीकरता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद, चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल,' असं ट्वीट शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येणार? शिवसेना नेत्याच्या ट्विटने खळबळ
फडणवीस, पाटलांकडून मेटेंना सत्तेच्या वाट्याचे संकेत ; ऑगस्टमध्ये मंत्रीपदाची लाॅटरी ?

दिपाली सय्यद यांचं पहिलं ट्विट

त्याआधीही शनिवारी (१६ जुलै) दिपाली सय्यद यांनी आणखी एक ट्वीट करत मोठे संकेत दिले होते. ‘लवकरच माननीय आदित्य साहेब मंत्रीमंडळात दिसावे, शिवसेनेच्या ५० आमदारांनी मातोश्रीवर दिसावे, आदरणीय उद्धव साहेब व आदरणीय शिंदेसाहेब एक व्हावे, शिवसेना हा गट नसुन हिंदुत्वाचा गड आहे, त्यावरचा भगवा नेहमी डौलाने फडकत राहील’. असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहीलं आहे.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र यावं ही सर्वांची इच्छा

या संदर्भात आज पत्रकार परिषदेतही त्यांनी शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाने एकत्र येण्यावर भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला, असा सवाल विचारला असता दिपाली सय्यद म्हणाल्या की, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला हे मला माहित नाही. पण, महत्वाचं हेच आहे की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं. शिवसेना एक व्हावी, ही सर्व आमदारांचीच इच्छा आहे.

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येणार? शिवसेना नेत्याच्या ट्विटने खळबळ
चंद्रकांत पाटलांपाठोपाठ फडणवीस दिल्लीत; मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत?

-शिवसेनेत दोन गट नकोत

वाद आणि अपमान बाजूला ठेऊन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र यावं. शिवसेनेत दोन गट नको अशी माझीही भावना आहे. तुटलेलं घर पुन्हा एकत्र यावं हे बोलण्यासाठी मला कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही. मी कार्यकर्ते आणि आमदारांच्याच मनातील इच्छा व्यक्त करत आहे. एकत्र येण्यासाठी कोणतीतरी एक गोष्ट अडतीये तीच तोडण्याची माझी भूमिका आहे. सगळ्यांनी एकत्र येण्यातच शिवसेनेचं भलं आहे.

- संजय राऊतांनी थोडं शांत राहण्याची गरज

मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना सुद्धा भेटले आहे. इतर आमदार, खासदार आणि कार्यकर्ते यांच्या मनात तेच आहे जे मी बोलते आणि ते होईल, अस मला वाटत. मी सेनेच्या तिकिटावर लढले. गेली दोन अडीच वर्षे मी पक्षासाठी काम करत आहे. शिवसैनिक म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे. उलट आता संजय राऊत यांनीच थोडं शांत राहण्याची गरज आहे, असही दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com