Maharashtra Budget : ठाकरेंनी अर्थसंकल्पाचे एका शब्दांत केले वर्णन; म्हणाले...हा तर गाजर हलवा संकल्प!

Devendra Fadnavis News : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama

Uddhav Thackeray News : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात फडणवीस यांनी अनेक योजनाची घोषणा केली. त्यावरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी टीका केली.

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. मात्र, गरजेल तो बरसेल काय? असा टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्या सरकारच्या काळात कोरोना होता. केंद्र सरकारकडे जीएसटीचा मोठा परतावा बाकी होती. आता हे सरकार महाशक्तीचा पाठिंबा असलेले हे सरकार कसा कारभार करते ते पाहिले आहे.

Uddhav Thackeray News
Maharashtra Budget : जलयुक्त शिवार दोन योजना; मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी फडणवीसांची मोठी घोषणा

मी छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्यांशी बोलत होतो. मध्यंतरी जो पाऊस झाला, त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मात्र, अजूनही हे सरकार शेतकऱ्यांच्या बाधांवर पंचनामे करण्यासाठी गेलेले नाही, असा आरोप ठाकरे यांनी केला. सर्व घटकांना मधाचे बोट लावण्याचा प्रयत्न झाला आहे. मुंबईमध्ये पावसाचा गडगडाट झाला. मात्र, पाऊस काही पडला नाही. त्यामुळे गरजेल तो बरसले काय? एका वाक्यात सांगायचे म्हटले तर गांजरांचा हलवा, असा हा अर्थसंकल्प आहे.

Uddhav Thackeray News
Maharashtra Budget : फडणवीसांची मोठी घोषणा : मुलींना ७५ हजार रुपये; जनआरोग्य योजनेत पाच लाखापर्यंत खर्च

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरु केली होती. ती योजना आमची होती. तीच योजना आता राज्यभर राबवणार आहे. घोषणा केलेल्या योजना कधी प्रत्यक्षात येणार आहेत, असा सवाल त्यांनी केला. विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करताना मंत्री दीपक केसकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत होते. नाव घेण्याबद्दल आक्षेप नाही. मात्र, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सत्तेवर येताना शेतकऱ्यांचे उत्त्पन दुप्पट करणार असे सांगितले होते, त्याचे काय झाले, असा सवाल ठाकरे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com