मुंबईवर आता गिधाडांची औलाद फिरायला लागली; उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला

मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama

मुंबई : आज एवढे आहेत, दसऱ्याला किती असले, दसरा आपला परंपरेप्रमाणे शिवतीर्थवरच होणार. रिकामी खुर्ची पाहिली. संजय राऊत यांची, मिंदे सगळे तीकडे गेले आहे. संजय राऊत (Sanjay Raut) मोडेल पण वाकणार नाही, या निच्छयाने लढत आहेत. दुसरे बघितले, आमचे वडील जागेवर आहेत ना, कारण मुलं पळवणारे पाहिले. मात्र, बाप पळवणारी अवलाद पहिल्यांदाच पाहिली, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लगावला.

शिवसेनेतील बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात गटप्रमुखांच्या मेळावा घेतला. यावेळी त्यांनी शिंदे गट, भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईवर आता गिधाडांची औलाद फिरायला लागली आहे. मुंबईचा लचका तोडण्यासाठी फिरत आहेत. स्वराज्यावरती अनेकजण चालून आले होते. त्यातील आता अमित शहा, देशाचे गृहमंत्री. मुंबईत काय बोलले, शिवसेनेला (Shivsena) जमीन दाखवा. तुम्ही जमीन दाखवाच तुम्हाला आसमान दाखवल्या शिवाय राहणार नाही.

Uddhav Thackeray
खेवरेंचे खासदार लोखंडे यांना आव्हान : हिंमत असेल तर नगर जिल्ह्याच्या उत्तरेत बैठका घ्या...

मुंबई संकटात असते तेव्हा ही गिधाडे कुठे असतात. मुंबई जमीन नाही, ही आमची मातृभूमी आहे. जो आमच्या अंगावर येईल त्याचा राजकारणात कोथळा बाहेर काढल्या शिवाय राहणार नाही. आईला गिळायला निघालेली आवलाद आहे. दसरा मेळावा येतोच आहे, तेव्हा बोलणार आहेच.

आज मुंबईवरती बोलणार आहे. कमळाबाईचा आणि मुंबईचा सबंध काय आहे, असा सवाल केला. कमळाबाई हा शब्द बाळासाहेबांचा आहे. मुंबईवर हक्क सांगू नका. वंशवाद कसला वंशवाद, मला माझ्या वंशाचा अभिमान आहे, मुंबईच्या लढ्यात माझे आजोबा होते. जनसंघाने समिती फोटली, ही त्यांची औलाद आहे.

Uddhav Thackeray
रश्मी ठाकरेंबद्दल तसं बोलायला नको होतं; रामदास कदमांना उपरती

आमची २५ वर्ष युतीमध्ये सडली. ही सगळी नालायक लोक आपण जिंकली. काही नसताना यांना पदे दिली. मराठी माणसासाठी तुमचा वशं कोणता, बावनकुळे की १५२ कुळे, असा टोला लगावला. ७० वर्षानंतर चित्ता आणला. काय जाहिराती सुरु होत्या. दार उघडल्यावर चित्ता करतो मॅव, असा चिमटा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com