गद्दार म्हणू नका म्हणता; पण तुम्ही तर कपाळावरच शिक्का मारुन घेतला; ठाकरेंनी डिवचले

ज्यांना शेंदूर लावला, ते शिवसेना (ShivSena) गिळायला निघालेत, उद्धव ठाकरे यांची टीका
 Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama

मुंबई : ज्यांना शेंदूर लावला, ते शिवसेना (ShivSena) गिळायला निघालेत. त्यांना भाजपची (BJP) सात आहे, त्यांना अंदाज नाही, कोणत्या शक्तीसोबत पंगा घेतला, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला आहे. भाजपला (BJP) ठाकरे आणि शिवसेना हे नाते संपवाचे आहे, असेही त्यांनी सांगितले. याआधी अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आता शिवसेना संपवण्याचा डाव आखला आहे, असे ठाकरे म्हणाले.

शिंदे गटाला कुठल्या ना कुठल्या पक्षात जाण्याशिवाय पर्याय नाही, असे अनेक तज्ज्ञ सांगतात. काल त्यांना एका पक्षाने ऑफर दिली होती, किती जणांचा केमिकल लोचा झाला माहित नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना लगावला. किती वादळ आली तरी शिवसेनेची पाळे मुळे घट्ट आहे.

 Uddhav Thackeray
...तर अडिच वर्षासाठी भाजपच्या एखाद्या दगडाला शेंदूर लागला असतात : ठाकरेंचा हल्लाबोल

जे गेले त्यांचे कोणत्या भाषेत वर्णन करायचे, काल त्यांनी आम्हाला गद्दार बोलू नका, अशी विनंती केली. हे आम्ही नाही, त्यांनी त्यांच्या कपाळावर शिक्का मारुन घेतला आहे. जे गेले आहेत, त्यांच्या बरोबर एकही शिवसैनिक नाही. 2019 मध्येच सर्व समसमान ठरले होते. मात्र, त्यानंतर जागा तर कमी दिल्याच. पण जे ठरले होते, त्याबाबात नाही म्हणाले.

 Uddhav Thackeray
ठाकरेंच्या दौऱ्याला प्रतिसाद अन् मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये ; औरंगाबाद, नाशिकला येणार..

त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या जागा पाडल्या. अडित अडित वर्ष सत्ता द्या म्हटले होते. तेव्हा नाही म्हणाले मग आता कसे जमले, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. कोणलाच मनावर दगड ठेवून करायची गरज नव्हती, असा टोमणा त्यांनी नाव न घेता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com