...तर अडिच वर्षासाठी भाजपच्या एखाद्या दगडाला शेंदूर लागला असतात : ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते मुंबईमध्ये शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन
Uddhav Thackeray latest marathi News
Uddhav Thackeray latest marathi NewsSarkarnama

मुंबई : हल्ली दिवस असे आहेत, आमदार-खासदार जे सांगतात ते करावेच लागते. सध्या कळतच नाही, कोण-कोणा सोबत आहेत. जे गेले त्यांचे वर्णन कोणत्या भाषेत करायचे आहे. जे गेले ते म्हणतात आम्हला गद्दर म्हणू नका, पण तुम्ही तुमच्या कपाळावर शिक्का मारला आहे. त्यामुळे आम्ही नाही, पण जनता बोलणार, असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर केला.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईमध्ये शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी बंडखोर आमदार आणि भाजपवर चौफेर टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, २०१९ मध्ये सगळे ठरले होते. आपले चांगले निवडणून आले. भाजपची एकहाती सत्ता आली. जे मंत्रीपद नको आहे तेच मंत्रीपद आमच्या गळ्यात मारले. आता म्हणतात, आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री केला. अडीच वर्षापूर्वी जे जर सन्माने केले असते. तर भाजच्या कोणत्यातरी एका दगडाला अडिच वर्षासाठी शेंदूर लागला असता. सगळे ठरले होते, जागा ५०-५० टक्के, शिवसेनेचा मुख्यमंत्री संभवही नाही, असे म्हणत होते. मग आता कसे काय झाले, असा सवालही त्यांनी केला.

Uddhav Thackeray latest marathi News
आमदारांना 50 कोटींची तर खासदारांना किती कोटींची ऑफर होती?; बारणेंनी स्पष्टच सांगितलं

पुन्हा आता एकदा सामान्यातून असामान्य लोक घडवायचे आहेत. शिवसैनिकांची ताकद मोठी आहे. कोणत्या शक्तीशी त्यांनी पंगा घेतला आहे हे त्यांना कळालेले नाही. शिवसैनिक दिल्लीलाही झुकवू शकतात. आपल्या मनगटात ताकद आहे, ही ताकद शिवसेनेने दिली आहे. शिवसेनेने या दगडांना शेंदूर लावला होता. ते शिवसेना फोडायला निघाले आहेत, असा निशाणा त्यांनी सांधला.

Uddhav Thackeray latest marathi News
BJP : भाजप नेत्यानंच रचलं 'लव जिहाद'चं षडयंत्र; मुलीने न्यायालयातच केली पोलखोल

शिवसेनेचा भगवा, देशभरात, मराठी माणसाला आणि हिंदुत्वामध्ये फुट पाडण्यासाठी निघाले आहेत. शिवसेना हिंदुत्वासाठी राजकारण करते आणि भाजप राजकारणासाठी हिंदुत्व वापरते, असा टोला ठाकरे यांनी लगावला. मी एका क्षणामध्ये वर्षा सोडले. 'मातोश्री'त आल्यानंतर माझी शक्ती मला कळते आहे. त्यांना जागा दाखवण्याची तादत फक्त तुमच्यामध्येच आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in