ठाकरेंचे शहांना आव्हान : हिंमत असेल तर महिनाभरात मुंबई पालिकेची निवडणूक घेऊन दाखवा

उद्धव ठाकेर (Uddhav Thackeray) यांची फटकेबाजी
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama

मुंबई : मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना आव्हान देतो की हिंमत असेल तर मुंबई महापालिका निवडणुका महिनाभरात घेऊन दाखवा. आणी त्याच वेळेत विधानसभेच्या निवडणुका घ्या. कुस्ती खेळायची सवय आम्हालाही आहे. कोण पाठ लावते ते पाहू, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.

शिवसेनेतील बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, गद्दार आहेत ते. गद्दारांमध्ये रक्त गद्दारांचे असते. कुत्र्यामध्ये निष्ठा असते. गोचीड गळून गेले, ते बरेच झाले. ढिगभर गद्दार असल्यापेक्षा मुठभर निष्ठावंत माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेवटची निवडणूक म्हणून लढा. पण आपण ही आपली पहिली निवडणूक आहे, असे समजून लढा. आज आपल्याकडे काही नाही. नगरसेवक नाहीत. नव्याने भगवा लावायचा आहे.

Uddhav Thackeray
खेवरेंचे खासदार लोखंडे यांना आव्हान : हिंमत असेल तर नगर जिल्ह्याच्या उत्तरेत बैठका घ्या...

शिवसेनेना म्हणजे विश्वास, हिमंत आहे. २०१२ मध्ये आपण करुन दाखवले अशा दोन शब्दावर जिंकलो. हे करुन दाखवले आहे, असे मुंबई महापालिका जिंकण्यासाठी, सगळे शिवसेनेवर तुटून पडणार आहेत. मर्द असतो, तो याच लढाईची वाट बघत असतो. जे वातावरण आहे, ते मी आज आव्हान देतोय, तुमचे कोणतेही डावपेच यशस्वी होणार नाही. तुम्ही कोणताही भेदभाव करुन पहा, असेही ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
मुंबईवर आता गिधाडांची औलाद फिरायला लागली; उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला

शिवसेनेचे नगरसेवक जाणार आहेत, जा आता दार उघडा आणि जा. मी आमदारांसोबत तेच केले. दारे उघडी आहेत, जा बेईमान माणसे किती दिवस राहणार आहेत. हे बुडबुडे आहेत. किती दिवस राहणार आहेत. बाळासाहेबांना अभिमान वाटला पाहिजे, असे काम करायचे आहे. मुंबई महापालिकेची जबाबदारी मी तुमच्यावर टाकतो, असेही ठाकरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in