आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा, कर्तबगारी दाखवा ; फडणवीसांचा टोमणा

जीएसटीच्या भरपाईपोटीवरुन महाराष्ट्राला १४ हजार १४५ कोटी रुपये मिळाले आहेत.
Uddhav Thackeray News, Devendra Fadnavis News in Marathi, Petrol Diesel Price news
Uddhav Thackeray News, Devendra Fadnavis News in Marathi, Petrol Diesel Price news sarkarnama

मुंबई : केंद्रसरकारने विविध राज्यांना एकाचवेळी तब्बल ८६ हजार ९१२ कोटी जीएसटीच्या भरपाईपोटी दिले. महाराष्ट्राला १४ हजार १४५ कोटी रुपये मिळाले आहेत. केंद्राने जीएसटीचा पैसा अडविल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून सातत्याने होत असताना मंगळवारी केंद्राने महाराष्ट्राला मोठा दिलासा दिला. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. (Petrol Diesel Price news update)

फडणवीस यांनी टि्वट करीत सरकारवर टीका केली आहे. "आता तरी पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रात कमी करणार की पुन्हा आज 1जूनपासूनचे शिल्लक दाखवून केंद्रावर खापर फोडत धन्यता मानणार," अशा शब्दात फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला टोमणा लगावला. (Devendra Fadnavis News in Marathi)

"31 मे 2022 पर्यंतचा जीएसटी, जानेवारीपर्यंतच्या कम्पेन्सेशनसह संपूर्ण रक्कम केंद्र सरकारने काल सर्व राज्यांना दिली. यात महाराष्ट्राला सर्वाधिक ₹14,145 कोटी आता तरी पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रात कमी करणार की पुन्हा आज 1जूनपासूनचे शिल्लक दाखवून केंद्रावर खापर फोडत धन्यता मानणार," असे त्यांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray News, Devendra Fadnavis News in Marathi, Petrol Diesel Price news
Rajya Sabha election : त्यांना कितीही घोडे उधळू द्या, जिंकणार आम्हीच ; राऊतांचा निर्धार

फडणवीस आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, "राज्य सरकार म्हणून कर्तबगारी दाखविण्याची वेळ जेव्हा-जेव्हा महाविकास आघाडीवर आली, तेव्हा प्रशासनाची 'ढकलगाडी' करण्यातच त्यांनी धन्यता मानली. केंद्रावर दोषारोप हाच पुरूषार्थ समजण्याची चूक आणखी किती काळ करणार? आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रात तत्काळ कमी करा,"

राज्याची २६,५०० कोटींची थकबाकी असल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच केला होता. यानुसार अद्यापही १२ हजार कोटींची राज्याची थकबाकी केंद्राकडे कायम आहे. तर राज्यांची नुकसानभरपाईची सर्व रक्कम वितरित केल्याचा दावा केंद्राने केला आहे.

Uddhav Thackeray News, Devendra Fadnavis News in Marathi, Petrol Diesel Price news
धक्कादायक : भाजप माजी आमदाराच्या भावांची गोळ्या झाडून हत्या

महाराष्ट्राखालोखाल तामिळनाडू – ९,६०२ कोटी रुपये. उत्तर प्रदेश ८,८७४ कोटी रुपये, कर्नाटक ८,६३३ कोटी रु., दिल्ली ८,०१८ कोटी रु., पश्चिम बंगाल ६,५९१ कोटी रुपये, असा निधी देण्यात आला आहे. महाराष्ट्राला केंद्राकडून जीएसटीपोटी एकूण २६ हजार ५०० कोटी रुपये घ्यायचे आहेत. त्यातील १४ हजार १४५ कोटी रुपये मंगळवारी वितरित करण्यात आले. ही महाराष्ट्राला आतापर्यंत एका हप्त्यात मिळालेली सर्वांत मोठी रक्कम आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com