Uddhav Thackeray : ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का ; पालघर जिल्ह्यात ठाकरे गटाला खिंडार!

Uddhav Thackeray : शिंदे गटात प्रवेश करताच ठाकरे गटाच्या नेत्यावर मोठी जबाबदारी.
Eknath Shinde News, Uddhav Thackeray News
Eknath Shinde News, Uddhav Thackeray NewsSarkarnama

पालघर : शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या पालघर जिल्हा प्रमुखाने शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरेंना गेल्या काही दिवसांपासून धक्यावर धक्के बसत आहेत. त्यातच आता ठाकरे गटाचे पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांनी शिंदे गटात प्रवेश केला. चव्हाण यांनी शिंदे गटात प्रवेश करताच त्यांच्यावर मोठी जबाबदारी देखील देण्यात आली आहे.

शिंदे गटाकडून चव्हाणांना बोईसर, विक्रमगड विधानसभा क्षेत्र याबरोबरच पालघर जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला पालघर जिल्ह्यात मोठं खिंडार पडलं आहे. वसंत चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात म्हणजेच शिंदे गटात प्रवेश केला. ते पालघर (Palghar) जिल्हा परिषदेतील सदस्य देखील आहेत.

Eknath Shinde News, Uddhav Thackeray News
सुषमा अंधारे म्हणाल्या, 'मी शिवबंधन तोडायला तयार, पण....'

उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले शिलेदार आता शिंदे गटात प्रवेश करत असल्यामुळे हळूहळू शिंदे गटाची ताकद वाढत आहे. चव्हाणांच्या पक्षप्रवेशावेळी आमदार आणि पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख रविंद्र फाटक जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे, यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Eknath Shinde News, Uddhav Thackeray News
Shivsena : सुषमा अंधारे करणार भुमरे, सत्तारांचे `प्रबोधन`, १८ - १९ ला मतदारसंघात घेणार सभा..

दरम्यान, खासदार गजानन कीर्तिकर हे देखील काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात दाखल झाले. या आधी काहीदिवसांपूर्वीच अभिनेत्री दिपाली सय्यद यांनीही शिंदे गटात जाण्याची घोषणा केली आहे. आता पालघर जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडल्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा धक्का मानला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com