Uddhav Thackeray पुन्हा अॅक्शन मोडमध्ये ; पक्षबळकटीसाठी बैठकांचा सपाटा

Uddhav Thackeray : शिंदे गटातील 12 खासदारांच्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका मातोश्रीवर होणार आहेत.
 Udhav Thackeray
Udhav Thackeraysarkarnama

Uddhav Thackeray : शिवसेनेतून बंड करीत एकनाथ शिंदे यांच्या गटात ४० आमदार गेले, त्यानंतरही शिवसेनेतील गळती अद्यापही सुरु आहे. आमदारांपाठोपाठ शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 12 खासदारांनीही शिंदे गटात प्रवेश केला. (Uddhav Thackeray latest news)

शिवसेनेतील गळती रोखण्यासाठी व स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. सद्यस्थितीत शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे 6 खासदार आहेत तर शिंदे गटाकडे 6 खासदार आहेत. दरम्यान शिंदे गटातील 12 खासदारांच्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका मातोश्रीवर होणार आहेत.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर ठाकरे गटातील नेत्यांच्या दौऱ्यात वाढ झाली आहे. युवानेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्याचे मनावर घेतले आहे. त्यांच्या दौऱ्यांना प्रतिसाद मिळत आहे. नुकताच त्यांनी पुणे व नाशिक येथे दौरा केला.

 Udhav Thackeray
Bachchu Kadu : 'फुसका फटका' की बॅाम्ब ? ; ट्रेलर 1 तारखेला, 15 दिवस पिक्चर बघा !

राज्यात सत्तातर झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे दिवाळीत मराठवाड्यात दौऱ्यावर होते. तेथे त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागमी ठाकरेंनी केली होती. दिवाळी नंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा ऍक्शन मोड मध्ये येत आहेत.

2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी उद्धव ठाकरे आतापासूनच करीत आहेत, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहेत. कारण पुढील पंधरा दिवस उद्धव ठाकरेंनी बैठकांचा सपाटा लावलेला दिसत आहेत. या सर्व बैठका उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी होणार आहेत.

शिवसेनेचा नवी झळाली आणण्यासाठी 31 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या 15 दिवसांमध्ये उद्धव ठाकरे संपूर्ण राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने राज्यात ज्या लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती त्या मतदार संघातील प्रामुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com