Uddhav Thackeray News : दोघांना एकत्र येण्यास अडचण नाही; ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

Uddhav Thackeray News : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर
Uddhav Thackeray, Prakash Ambedkar
Uddhav Thackeray, Prakash AmbedkarSarkarnama

Uddhav Thackeray News : दोघांचे वैचारिक व्यासपीठ एकच आहे. त्यामुळे एकाच व्यासपीठावर येण्यासाठी अडचण आली नाही आणि येणार नाही, ज्याची अपेक्षा लोकांना आहे तशी ती अडचण येणारही नाही. दोघेही विचारांचे वारसे घेऊन पुढे आलो आहोत, असे शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य आणि विचार वाचकांपर्यत पोहचविणासाठी 'प्रबोधनकार डॉट कॉम' या संकेतस्थळाचा लोकार्पण सोहळा आज मुंबईच्या दादरमध्ये पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे एका व्यासपीठावर आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

Uddhav Thackeray, Prakash Ambedkar
ठाकरेंकडे १५-१६च आमदार; संधी मिळाली तर शिवसेना सोडणार का? कायदेंनी स्पष्टच सांगितले

यावेळी उद्धव ठाकरे यांनी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांची आठवण केली. रामदास आठवले यांच्यासोबत एकत्र आलो होतं, आता प्रबोधनकार यांच्यासोबत आपली एकाच मंचावर भेट झाल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, काही वर्षांपूर्वी कलिना येथे असाच कार्यक्रम झाला होता. त्यावेळेला सोबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले होते. त्यावेळेला ते मला उद्देशून म्हणाले होते उद्धवजी तुम्ही प्रबोधनकारांचे नातू आणि आम्ही वैचारिक नातू आहोत. तेव्हा मी त्याला म्हटले होते एकत्र या असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

Uddhav Thackeray, Prakash Ambedkar
फडणविसांनी बाजू सावरली; म्हणाले, राज्यपाल कोश्‍यारी अन् त्रिवेदींच्या वक्तव्याचा विपर्यास होतोय

मला आज आनंद आणि अभिमान आहे, असे काही नाही की प्रकाशजी आणि माझी ओळख नाही. आम्ही एकमेकांना चांगले ओळखतो. मध्ये-मध्ये भेटलेलो सुद्धा आहे. असेही उद्धव ठाकरे म्हणाले. प्रकाशजी यांना भेटायचे म्हणजे वेळ काढून भेटायला पाहिजे. कारण ते माहिती आणि ज्ञान याचा धबधबा आहेत. आम्ही आज पहिल्यांदा एका व्यासपीठावर एकत्र आलो. मात्र, वैचारिक व्यासपीठ आमचे दोघांचे एकच आहे. त्यामुळे एकाच व्यासपीठावर एकत्र येण्यात आम्हाला अडचण आली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in