Navi Mumbai News : नार्वेकरांची तपस्या फळाला; ठाकरे पिता-पुत्रांनी दिली जागा अन मुख्यमंत्री शिंदेंनी केलं भूमिपूजन !

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : आदित्य ठाकरेही तिरुपती बालाजीचे भक्त आहेत.
Navi Mumbai News
Navi Mumbai News Sarkarnama

Navi Mumbai : नवी मुंबईतल्या उलवेनोडमध्ये तिरुपती बालाजीचं भव्य मंदिर बांधण्यात येणार आहे. या मंदिराच्या प्रतिकृतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी(दि.७) सकाळी करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, नवी मुंबईतील आमदार, खासदार आणि स्थानिक नेते उपस्थित होते. या प्रकल्पाला संपूर्णत: मदत करण्याचे आश्वासन शिंदे आणि फडणवीस यांनी बुधवारी(दि.७) दिले.

तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या काळात नवी मुंबईतील उलवेनोड येथे प्रति बालाजी मंदिराच्या निर्मितीसाठी जागा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यामंदिराचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. मात्र, या कार्यक्रमानंतर उध्दव ठाकरेंचें विश्वासू मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट केलं आहे. हे ट्विट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

उध्दव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे मिलिंद नार्वेकर(Milind Narvekar) यांनी नवी मुंबई येथील उलवेनोड येथील प्रतिबालाजी मंदिराच्या प्रतिकृती भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर एक ट्विट केलं आहे. त्यांनी या ट्विटमध्ये ठाकरे पितापुत्रांच्या प्रतिबालाजी मंदिराच्या योगदामधील गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. मात्र, नार्वेकरांनी ट्विट करून ठाकरे पितापुत्रांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. नार्वेकरांचे मुख्यमंत्री शिंदेंशीही जवळचे संबंध आहेत.

नवी मुंबईतील उलवे येथे तिरुपतीतील बालाजी मंदिरासाठी उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना त्यांचे पुत्र तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मंदिर ट्रस्टला मिळाली होती. या जागेचा पाठपुरावा करून ती यशस्वीपणे मिळवणारे शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आणि मंदिर ट्रस्टचे विश्वस्त मिलिंद नार्वेकर आज भूमिपूजनाला हजर होते.

आम्ही काय कुणाला देणार ? मुख्यमंत्र्यांचा टोला

ट्रस्टच्या अध्यक्षांनी ही जागा आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नाने मिळाल्याचे सांगितले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी या संदर्भात कुठलेही राजकीय विधान न करता आम्ही काय कुणाला देणार ? देतो करतो करवतो तो बालाजी असे कार्यक्रमात सांगितले. प्रसिध्द उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी या मंदिराचा बांधकाम खर्च एकहाती उचलला आहे. आज ही जागा मिळावी यासाठी सर्व विश्वस्तांनी मदत केली असे सांगण्यात आले.

मंदिर भाविकांचे आकर्षण ठरणार...

उद्धवजींनी त्यावेळी आंध्रचे मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्याकडे नार्वेकरांना विश्वस्त मंडळावर नेमा अशी शिफारस केली होती असे म्हणतात. आदित्य ठाकरेही तिरुपती बालाजीचे भक्त आहेत. प्रारंभी बांद्राकुर्ला परिसरात प्रतिबालाजी मंदिर बांधण्याचे निश्चित झाले होते. मात्र, नवी मुंबईत भूखंड मोठा असल्याने तेथे मंदिराचे बांधकाम करण्याचे ठरले. हे मंदिर भाविकांचे आकर्षण होणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com