अपयश लपविण्यासाठी उद्धव ठाकरेंचा भाजपवर आरोप....चंद्रशेखर बावनकुळे

मित्र पक्षांना friendly parties ताकद देण्याचे काम भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi, अमित भाईंनी Amit Shaha केले आहे. त्यामुळे ठाकरेंचा Udhav Thackeray हा आरोप हस्यास्पद आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankulesarkarnama

मुंबई : उद्धव ठाकरे मु्ख्यमंत्री झाले, त्यावेळी त्यांनी किती खर्च केले होते, असा प्रश्न उपस्थित करून सरकारं पाडणे आणि सरकारं येणे याकरिता पैशाचा घोळाचा आरोप लावणे हे उद्धव ठाकरेंना शोभत नाही. आपले अपयश लपविण्यासाठी त्यांनी असा आरोप केला आहे, अशी टीका भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतील टीकेला भाजप नेते बावनकुळे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिउत्तर दिले. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतींचा सर्व रोष भाजपवर आहे, याविषयी विचारले असता ते म्हणाले, ते मुलाखत देतात आणि संजय राऊत मुलाखत घेतात. त्यामुळे याकडे किती लक्ष द्यायचे हे महाराष्ट्रातील जनता ठरवेल. प्रश्न व उत्तरही तेच लिहून देतात, त्यामुळे त्यांचे आरोप निंदनीय आहेत.

Chandrashekhar Bawankule
उद्धव ठाकरेही शिवसेना प्रमुख होऊ शकत नाहीत; संजय शिरसाट थेटच बोलले

आपल्याच आमदारांवर एक हजार कोटी घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या आधी बंडखोर आमदारांनी व एकनाथ शिंदेनीही हे सरकार कसं पडलं हे सांगितले आहे. उद्धव ठाकरे ज्यावेळी मु्ख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी किती खर्च केले होते, असा प्रश्न उपस्थित करून बावनकुळे म्हणाले, सरकारं पाडणे आणि सरकारं येणे याकरिता पैशाचा घोळाचा आरोप लावणे हे उद्धव ठाकरेंना शोभत नाही. त्यांनी आपले अपयश लपविण्यासाठीच असा, आरोप केला आहे.

Chandrashekhar Bawankule
sanjay raut video : देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांचं चॅलेंज

भाजपने मित्रपक्ष संपविले, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यावर बावनकुळे म्हणाले, सर्व मित्रपक्ष आजही भाजपसोबत आहेत. नितीशकुमार यांना भाजपने मुख्यमंत्री केलं. एकनाथ शिंदेंसारख्या चांगल्या कार्यकर्त्यांला संधी देऊन मुख्यमंत्री केलं. मित्र पक्षांना ताकद देण्याचे काम केंद्रीय नेतृत्वाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित भाईंनी केले आहे. त्यामुळे ठाकरेंचा हा हा आरोप हस्यास्पद आहे.

Chandrashekhar Bawankule
बावनकुळे म्हणाले, महाजनकोकडून लवकरात लवकर मदत मिळवून देऊ...

मी बरे नसल्याने भाजपने हे षडयंत्र केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावर बावनकुळे म्हणाले, गेली दोन अडीच वर्षे मास्कच्या बाहेर न आलेला नेता आहे. अजित पवार, उद्धव ठाकरे साहेब व आदित्य ठाकरे कधीही मास्कच्या बाहेर आले नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in