बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्र अनावरण कार्यक्रमास उद्धव ठाकरे गैरहजर

या कार्यक्रमास उद्वव ठाकरे कुटुंबीय सोडता राज ठाकरे व ठाकरे कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
Balasaheb Thackeray-Uddhav Thackeray
Balasaheb Thackeray-Uddhav Thackeray Sarkarnama

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे तैलचित्र मुंबईच्या विधानभवनात लावण्यात आले आहे. त्याचे अनावरण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मान्यवरांच्या उपस्थित होत आहे. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि कुटुंबीय या समारंभाला आलेले नाहीत. ठाकरे हे मुंबईतील षण्मुखानंद सभागृहातील पक्षाच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाले आहेत. या कार्यक्रमासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी पुढाकार घेतला आहे. (Uddhav Thackeray absent from Balasaheb Thackeray's oil painting unveiling event)

विधीमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याचा ठराव केला होता. त्याचे अनावरण आज विधीमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. या समारंभाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते अजित पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आदी उपस्थित आहेत.

Balasaheb Thackeray-Uddhav Thackeray
Nagar Lok Sabha : नीलेश लंके देणार सुजय विखेंना आव्हान : नगर लोकसभा लढविण्याचे संकेत

बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण होत असताना त्यांचे सुपुत्र आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे मात्र कार्यक्रमाला गैरहजर आहेत. या कार्यक्रमावर शिवसेनेकडून ‘राजकीय स्वार्थासाठीचा कार्यक्रम’ अशी टीकाही झाली होती. ठाकरे कुटुंबातील कोणीतरी कार्यक्रमाला येतील, असे सांगितले जात असताना आदित्य आणि उद्धव ठाकरे हे मात्र गैरहजर राहिले आहेत.

Balasaheb Thackeray-Uddhav Thackeray
Sharad Pawar News: पवारांचे हेलिकॉप्टर दुसऱ्याच हेलिपॅडवर उतरले अन प्रशासनाची एकच धावपळ उडाली...

बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण होत असताना उद्वव ठाकरे हे मात्र षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेच्या मेळाव्याला मार्गदर्शन करत आहेत. त्या कार्यक्रमास आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. या कार्यक्रमास उद्वव ठाकरे कुटुंबीय सोडता राज ठाकरे व ठाकरे कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in