Uddhav Thackeray : काय सांगता! शिंदे सरकार सत्तेत येऊन काही महिने उलटले, तरीही 'या' ठिकाणी उध्दव ठाकरेच मुख्यमंत्री!

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री शिंदे की ठाकरे असा प्रश्न उपस्थित होतोय!
Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड करत उद्धव ठाकरेंच्या यांच्या नेतृत्वाला आव्हान देत शिवसेनेतून बाहेर पडले होते. यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा दिला महाविकास आघाडी सरकार कोसळले होते.

यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत जात सत्तास्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदीविराजमान झाले आहेत. मात्र, शिंदे यांना मुख्यमंत्री दिलेलं भाजपच्या काही नेत्यांना रुचलेलं नाही. वारंवार चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या नेत्यांनी फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाबद्दल विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

परंतु, राज्यातील सत्तांतराला काही उलटले तरी सरकारी पातळीवर देखील उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री म्हणून झळकल्याचं समोर आल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Raksha Khadse : राष्ट्रवादीचे नेते खडसेंच्या मदतीला भाजप खासदार आल्या धावून..!

राज्यात सध्या लंपीचा आजाराने मोठं थैमान घालत आहे. या आजाराने शेतकरी कुटुंबासह राज्य सरकारचं देखील टेन्शन वाढवलं आहे. सरकारच्या पशुवर्धन विभागाकडून लंपी आजाराच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागातील ढिसाळ कारभाराचं दर्शन घडविणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पशुवर्धनच्या फिरत्या गाडीवर अजूनही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचाच फोटो झळकल्याचं वास्तव समोर आलं आहे. पशुवर्धनच्या या कारभारावर हसावं की रडावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांकडून  मंत्री शंभूराज देसाईंना नववर्षाची  अनोखी भेट..!

पशुवर्धनकडून ग्रामीण भागात लंपी आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्याविषयी जोरदार हालचाली सुरु आहे .तसेच गावोगावी खेडोपाडी फिरत्या दवाखान्यामार्फत जनावरांची तपासणी व औषधोपचार केलं जात आहे .पण या फिरत्या दवाखान्यावर मुख्यमंत्री म्हणून अजूनही उद्धव ठाकरे यांचाच फोटो दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राज्याच्या मुख्यमंत्री शिंदे की ठाकरे असा प्रश्न पडत आहे.

Uddhav Thackeray news
Uddhav Thackeray news Sarkarnama

राज्यातील सत्तातरांचे पहिले पडसाद हे सरकारी पातळीवर उमटत असतात. मात्र , पशुसंवर्धन विभागाच्या फिरत्या दवाखान्याच्या गाडीवर मुख्यमंत्री म्हणून असणारी ठाकरेंची छबी अजूनही कायम दिसल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फिरत्या दवाखान्यासाठी दिलेल्या गाड्यांवर अद्यापही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो दिसत आहे.

पशुवर्धन विभागाकडून लंपी आजारातंर्गत जनावरांच्या उपचारासाठी राज्यात ७२ फिरते दवाखाने अस्तित्वात आहे. त्यासाठी ७२ गाड्या देखील खरेदी केल्या असून त्यासोबत सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र, राज्यातील या सर्व गाड्यांवर अजूनही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यां\चा फोटो दिसत आहे.

या धक्कादायक प्रकारावर जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त अंकुश परिहार म्हणाले , पशुवर्धन विभागाच्या फिरत्या दवाखान्याची संकल्पना जेव्हा समोर आली तेव्हा शासनाने या गाड्या खरेदी करून जिल्हास्तरावर पाठवल्या आहेत. आपल्या सातारा जिल्हाला ३ गाड्या मिळाल्या आहेत. त्याचवेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांची छबी त्यावर निश्चित केली आहे. आम्हा अधिकाऱ्यांचा त्यामध्ये कोणताही सहभाग किंवा हेतू नाही. याबाबत योग्य ती कार्यवाही करू असे परिहार यांनी यावेळी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in