मातोश्रीबाहेर वातावरण तापलं; उदय सामंत सोलापूर दौरा रद्द करुन मुंबईत

Shivsena | Uday Samanat | Solapur Visit : राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणं करणार?
Uday Samant -  Rana
Uday Samant - RanaSarkarnama

मुंबई : हनुमान चालिसावरुन राज्यात शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य असा संघर्ष पेटला आहे. शिवसेनेनं कितीही अडवायचा प्रयत्न केला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचणारच असा ठाम निर्धार अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी बोलून दाखवला आहे. आज सकाळी ९ वाजता ते मातोश्रीवर जाणार आहेत. त्यासाठी राणा दाम्पत्यांचे खार येथील निवासस्थान व मातोश्री परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. (mp Navneet Rana Vs shivsena in Mumabai)

याच सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आपला सोलापूर दौरा रद्द करुन मुंबईत दाखल झाले असल्याची माहिती आहे. सामंत यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. "काही अपरिहार्य कारणामुळे मला माझा सोलापूर दौरा रद्द करावा लागला आहे.. पुढील तारीख निश्चित झाली की कळविनच..तसदी बद्दल क्षमस्व" असे ट्विट करत सामंत यांनी आपला सोलापूर दौरा रद्द केला असल्याची माहिती दिली आहे.

उदय सामंत आज सोलापूर दौऱ्यावर येणार होते. या दौऱ्यात सोलापूरमधील शासकीय तंत्रनिकेतन येथे त्यांची आढावा बैठक नियोजीत होती. त्यानंतर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा आढावा आणि श्री. तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाची आढावा बैठक घेणार होते. यानंतर ते सोलापूरमधील शिवसैनिकांशी संवादही साधणार होते. पुढे ते पंढरपूरला जाणार होते. मात्र मुंबईमधील सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी सोलापूर दौरा रद्द केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com