शिवसेनेचे आणखी २ खासदार अन् पाच आमदार शिंदे गटाच्या वाटेवर?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत आहेत
Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) मोठी फुट पडली आहे. शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्याचबरोबर पक्ष संघटनेतील अनेकांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. अशातच आता शिवसेनेचे दोन खासदार आणि पाच आमदार शिंदे गटात जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेला आणखी धक्के देण्याची तयारीत आहेत. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील दोन खासदार आणि पाच आमदारांवर शिंदे गटाची नजर आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आता दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयामध्येही तारीख पे तारीख सुरु आहे. त्यामुळे ठाकरे गटातील काही जणांना आता शिंदे गटाची ओढ लागली आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Shivsena : युवासेनेला खिंडार; रणजितसिंह भोसलेंचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश

गणेश उत्सवानंतर हा प्रवेश होऊ शकतो, अशी माहिती मिळत आहे. शिंदे गटाने दावा केल्यानुसार पाच आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. तर तीन खासदार सुद्धा त्यामध्ये आहेत. त्यातील दोन खासदार शिंदे गटात जाण्यासंदर्भात विचार करत आहेत. मात्र, तिसऱ्या खासदाराचे तळ्यात-मळ्यात सुरु आहे. या खासदारांशी बोलणी सुरु असल्याचेही समजते. शिंदे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, दुसऱ्या विस्ताराचे अनेकांना वेध लागले आहे. यामध्ये या पाच आमदारांचाही विचार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, खासदार गजानन किर्तीकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. किर्तीकर यांनी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी गणपती दर्शनाला गेले होते, असे सांगितले जात आहे. गणपती दर्शनासह भेटीत राजकीय चर्चा झाल्याचीही चर्चा आहे. याच भेटीनंतर किर्तीकर शिंदे गटात जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
उद्धवजी सांगायचे की, काँग्रेसच्या पालकमंत्र्यांसोबत सोबत काम करा; म्हणून...

उद्धव ठाकरे यांच्या सोबत सध्या १५ आमदार आणि ७ खासदार आहेत. तर शिंदे गटात ४१ आमदार आणि १२ खासदार आहेत. मात्र, अजुनही संघटनेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे शिवसेनेला आणखी धक्के देण्याच्या तयारीत शिंदे गट आहे. खरी शिवसेना कुणाची हे प्रकरण आता निवडणूक आयोगामध्ये गेले आहे. सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणी सुनावणी सुरु आहे. न्यायालयामध्ये आम्ही शिवसेना सोडलीच नाही, तर आम्ही पक्षातंर्गत उठाव केला, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोक आपल्या बाजूला आहेत, हे दाखवण्याचा शिंदे यांच्या प्रयत्न आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com