शिवसेनेच्या दोन आमदारांना सूरतमध्ये मारहाण : शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप

काही आमदारांना ठाण्यात जेवायला बोलावून तेथून त्यांचे अपहरण करण्यात आले आहे : संजय राऊत
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama

मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांना (MLA) जेवायला म्हणून ठाण्यात बोलावले आणि तेथून गाडीत बसवून थेट गुजरातला (Gujrat) नेण्यात आले आहे. तसेच, सूरतमध्ये जे आमचे १४ ते १५ आमदार आहेत, त्यातील दोन आमदारांना रात्री मारहाण करण्यात आली आहे. त्यातूनच आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांना ह्‌दयविकाराचा झटका आल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. (Two Shiv Sena MLAs beaten up in Surat : Sanjay Raut's serious allegations)

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वाविरोधात बंडाचे निशाण उभारले आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबड उडाली आहे. शिवसेना आमदारांच्या फुटीवर बोलताना खासदार राऊत यांनी वरील आरोप केला आहे.

Sanjay Raut
एकनाथ शिंदेंच्या खेळीमुळेच चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव?

ते म्हणाले की, आमचे १४ ते १५ आमदार जे सध्या सूरतमध्ये आहेत, त्यातील दोन आमदारांना रात्री मारहाण करण्यात आलेली आहे. त्यातील नितीन देशमुख हे मुंबईला येण्यासाठी हॉटेलच्या बाहेर येत होते, त्यावेळी त्यांना गुजरात पोलिस आणि ‘ऑपरेशन कमळ’वाल्या गुंडांकडून मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतरच त्यांन ह्‌दयविकाराचा झटका आला आहे. त्यांना आता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Sanjay Raut
मातोश्रीवरून निरोप येताच खासदार प्रताप जाधव बांधावरून थेट मुंबईकडे रवाना

सूरतमधील आमदारांपैकी चार ते पाच आमदारांनी मला स्वतःला फोन केले आहेत. आम्हाला या ठिकाणी अपहरण करून आणण्यात आले आहे. त्यांना माहितीही नव्हते की ते कुठे जात आहेत. ठाण्यात आम्हाला एका ठिकाणी जेवायला बोलावले आणि तेथून गाडीतून टाकून नेण्यात आले आहे. आमची येथून सुटका करा, अशी विनंती त्यांनी आमच्याकडे केलेली आहे, असे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Sanjay Raut
बंडानंतर एकनाथ शिंदेंचे प्रथमच ट्विट; उद्धव ठाकरेंना दिला अप्रत्यक्ष हा इशारा !

काही आमदारांच्या कुटुंबांनी आपले पती, वडील यांचे अपहरण झाले आहे, अशी तक्रार पोलिस ठाण्यात दिली आहे. अशा प्रकारला आपण लोकशाही आणि ऑपरेश कमळ असे म्हणत असाल ते तुम्हाला लखलाभ असो, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut
ठाकरे सरकार पडण्याची फक्त औपचारिकता बाकी : फडणवीसांच्या निकटवर्तीय आमदाराचे सूचक विधान

राऊत म्हणाले की, शिवसेना आमची आई आहे आणि आम्ही आमच्या आईशी गद्दारी करणार नाही. ईडी आणि सीबीआयने आमच्यावरही दबाव आणला होता. मात्र, आम्ही पक्ष सोडला नाही. काही लोक दबावात येऊ शकतात. आमच्या आमदारांना धमकी देण्यात आलेल्या आहेत. यातील काही लोकांची मजबुरी मला माहित आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com