मोठी बातमी : यशवंत जाधवांच्या डायरीत आणखी दोन नावं!

जाधव यांच्याकडील डायरीत मातोश्री असं लिहिल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. यावरून मोठं राजकारण तापलं होतं.
Yashwant Jadhav News,
Yashwant Jadhav News, sarkarnama

मुंबई : शिवसेना नेते यशवंत जाधव (Yasahwant Jadhav) यांची डायरी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. काही दिवसांपूर्वीच आयकर विभागाच्या (Income Tax) तपासात जाधव यांची डायरी विभागाला सापडली आहे. या डायरीतील एका नोंदीमध्ये मातोश्रीला 50 लाख रुपयांचे घड्याळ पाठवल्याचा उल्लेख आहे आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला मातोश्रीला 2 कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आढळला होता. आता डायरीत आणखी दोन नावं असल्याची माहिती सुत्रांनी दिली. (Yashwant Jadhav News)

जाधव यांच्या डायरीत मातोश्री अशी नोंद असल्याने राजकारण तापलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या घराचे नावही मातोश्री असल्याने भाजप नेत्यांनी त्यांना लक्ष्य केलं होतं. डायरीत मातोश्रीच्या उल्लेखावरून चौकशी केली असता यशवंत जाधव यांनी हे घड्याळ त्यांच्या आईच्या वाढदिवसाला भेट दिल्याचे सांगितले. दुसरीकडे, गुढीपाडव्याला आईच्या स्मरणार्थ गरजूंना भेटवस्तू दिल्याचा खुलासा त्यांनी केला. पण त्यांच्या या खुलाशावर आयकरचे अधिकारी समाधानी नव्हते.

Yashwant Jadhav News,
नितेश राणे पुन्हा अडचणीत; मालवण पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

त्यानंतर आता या डायरीत आणखी दोन नावं असल्याची माहिती समोर येत आहे. त्यापैकी पहिलं नाव 'केबलमॅन' असून त्याच्यासमोर एक कोटी 25 लाख रुपये दिल्याची नोंद आहे. तर दुसरं नाव 'M-ताई' हे असून त्यासमोर 50 लाख लिहिले असल्याची माहिती समोर आली आहे. ही दोन नावे म्हणजे नेमकं कोण, यावरून आता चर्चांना उधाण आलं आहे. यापैकी एक महिला व एक पुरूष असल्याचे स्पष्टपणे दिसते. पण या सांकेतिक नावांमुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापणार असल्याली शक्यता आहे.

यशवंत जाधवांच्या पत्नीचे शपथपत्राने पोलखोल

यशवंत जाधव यांनी बीएमसीच्या ३० कोटी रुपयांच्या विविध कंत्राटांसाठी बिमल अग्रवाल यांची मर्जी राखल्याचा आयकर विभागाला संशय आहे. जाधव यांच्या पत्नी आणि मुंबईतील भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांनी 2019 मध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. यात कोलकाता येथील प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून झालेल्या व्यवहाराची माहिती प्राप्तिकर विभागाला या शपथपत्रातून मिळाली होती. जाधव आणि कुटुंबीयांना भायखळा येथील इमारत खरेदीसाठी सुमारे १५ कोटी रुपये कंपनीने दिले होते. जाधव कुटुंबीयांनी नंतर हे पैसे कंपनीला परत केले, जे नंतर कंपनीने न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरित केले.

Yashwant Jadhav News,
सदावर्ते जो आदेश देतील त्यानुसार...! एसटी कर्मचाऱ्यांचा जल्लोष पण संप मिटणार का?

31 फ्लॅट खरेदी केले, हवालाद्वारे पैसे दिले

जाधव यांनी भायखळा येथील बिलकाडी चेंबर्स येथे न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून 31 फ्लॅट खरेदी केल्याची माहिती आहे. जाधव यांनी इमारतीतील चार ते पाच भाडेकरूंना 30 ते 35 लाख रुपये दिले होते. भाडेकरूंना हवालाद्वारे काही देयके देण्यात आली. विभाग इतर चाळीस मालमत्तांचीही चौकशी करत आहे. या मालमत्ता जाधव यांच्याशी संबंधित असल्याचा संशय आहे.

1.75 कोटींना हॉटेल खरेदी केले, 20 कोटींना विकले

जाधव यांच्या सासू सुनंदा मोहिते यांनी भायखळा येथे इंपिरियल क्राउन नावाचे हॉटेल खरेदी केले होते. न्यूजहॉक मल्टीमीडियाने ते हॉटेल भाड्याने दिले होते. यानंतर न्यूजहॉक कंपनीला बीएमसीकडून क्वारंटाइन सेंटरचे कंत्राट मिळाले. हे हॉटेल 1.75 कोटींना विकत घेण्यात आले होते, परंतु नंतर सुमारे वर्षभरात 20 कोटींना विकले गेले. जाधव यांच्या सासूबाईंनी हे हॉटेल खरेदी करण्यात प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या भूमिकेचीही चौकशी सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com