मनसेला दे धक्का: दोन माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Supreme Court| Shivsena-MNS Politics| सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला राज्यातील महापालिका निवडणूका जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.
मनसेला दे धक्का: दोन माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
Shivsena-MNS PoliticsSarkarnama

Shivsena-MNS latest news update

कल्याण : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राज्य सरकारला राज्यातील महापालिका निवडणूका जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. एकीकडे सत्ताधारी शिवसेना (Shivsena) आणि मनसेतील (MNS) वादही शिगेला पोहचला आहे. तर दूसरीकडे निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर आता शिवसेनेने मनसेला धक्का दिला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे दोन माजी नगरसेवक आणि अनेक पदाधिकारी आज मनसेला रामराम ठोकणार असून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

कल्याण -डोंबिवलीतील घारीवली, काटई, उसरघर येथील मनसेचे माजी नगरसेवक तसेच मनसेचे जिल्हा सचिव प्रकाश माने आणि मनसेच्या माजी नगरसेविका पूजा पाटील, मनसे तालुका प्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य गजानन पाटील हेदेखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत मनसेचे सुभाष तुकाराम पाटील, पांडे अण्णा, निशांत पाटील, भास्कर गांगुर्डे आणि विठ्ठल शिंदे आदीही शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

 Shivsena-MNS Politics
भाजप मनुस्मृती मानणारा पक्ष; सत्ताकाळात मुंडे, खडसेंना बाजूला केले...

मनसे विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष प्रवीण परदेशी आणि विद्यार्थी सेनेचे शाखा अध्यक्ष संदीप मोरे यांनीही मनसेला रामराम ठोकला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हे सर्वजण शिवसेनेचा भगवा हाती घेणार आहेत.

कोरोना महामारी आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणामुळे गेल्या काही महिन्यांपासून महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. मात्र दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महापालिका निवडणूका जाहीर कऱण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कल्याण -डोंबिवली महापालिकेची निवडणूक तोंडावर असतानाच मनसेचे दोन माजी नगरसेवक आणि असंख्य पदाधिकारी आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या राजकीय डावपेचामुळे कल्याण डोंबिवलीत शिवसेनेला हे यश मिळाल्याचं बोललं जात आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद महापालिकांवर राजकीय नेतेमंडळींच लक्ष लागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.