धक्कादायक : मासेमारीसाठी नदीवर गेलेल्या दोघा सख्ख्या भावांवर काळाचा घाला

नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
two brothers drown at kamwari river in bhiwandi
two brothers drown at kamwari river in bhiwandi

भिवंडी : कामवारी नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शहाबाज अन्सारी (24) आणि शाहआलम अन्सारी (27) अशी मृत्यू झालेल्या दोघा भावांची नावे आहेत. ही घटना भिवंडीतील चाविंद्रा भागात घडली. दोन सख्ख्या भावांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. 

मुंबई येथून दोन दिवसांपूर्वी भिवंडीतील चाविंद्रा मिल्लत नगर येथे शहाबाज आणि शाहआलम हे दोघे भाऊ आले होते. ते दोघे आपल्या आईसोबत शनिवारी सायंकाळी चाविंद्रा पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या कामवारी नदीत मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाय घसरून आलम हा पाण्यात पडला. तो पाण्यात बुडू लागल्याने शहाबाजने तात्काळ आईकडील ओढणी  घेऊन पाण्यात उडी मारली. मात्र, त्याला पाण्याचा अंदाज आला नाही अन् तोही बुडू लागला. 

या प्रकारामुळे घाबरलेल्या आईने रस्त्याच्या दिशेने धाव घेत मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. उपमहापौर इम्रान खान यांनीही कार्यकर्त्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पालिकेचा अग्निशमनदलाला बोलावले. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक तरुणांसह नदीत उतरून शोध घेतला असता रात्री 8.30 च्या सुमारास शाहआलमचा मृतदेह सापडला. मात्र, शहाबाजचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत न सापडल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली. 

आज सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरु करण्यात आली. सकाळी 10 वाजता शहाबाजचा मृतदेह नदीकिनारी आढळला. याप्रकरणी निजामपूरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने मिल्लत नगर परिसरात शोककळा पसरली आहे. 

हे ही वाचा : विनामास्क  व वाहन चालक यांच्यावर दंडात्मक कारवाई : ५८ हजार रुपयांचा दंड वसूल
नारायणगाव : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने नारायणगाव व वारुळवाडी ग्रामपंचायत परिसर २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान सात दिवस प्रतिबंधित क्षेत्र(कंटेनमेंट झोन) जाहीर केला आहे.या पार्श्वभूमीवर नियम व अटींचे पालन न करणारे व्यावसायिक,वाहन चालक, विनाकारण व विनामास्क फिरणारे यांच्यावर नारायणगाव पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. विनामास्क असलेल्या १५३ व्यक्ती ,नियम बाह्य वाहतूक करणारे ७७ वाहन चालक  यांच्यावर दंडात्मक कारवाई करून ५८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच सोशल डिस्टन्स न ठेवणाऱ्या व प्रतिबंधित क्षेत्र असून दुकान सुरू ठेवणाऱ्या वीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक डी. के. गुंड यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com