Ajit Pawar Group News: अजितदादा गटाचं ट्विटर अकाउंट निलंबित; काय आहे कारण ?

Ajit Pawar Group Twitter Suspended : "ट्विटरशी संवाद साधला असून, आजच अकाउंट सुरू होईल.."
Ajit Pawar Twitter Account
Ajit Pawar Twitter AccountSarkarnama

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाचे ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे मागील दोन दिवसांपासून हे ट्विटर अकाउंट निलंबित झाले आहे. अशा आशयाचा मॅसेजही या अकाउंटवर दिसून येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने तक्रार केल्यानंतर ट्विटरकडून (एक्स) ही कारवाई करण्यात आलेली आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar Twitter Account
Sangli NCP News : विट्याचे पाटील जयंतरावांच्या तालुक्यात करणार अजितदादांचा जंगी सत्कार !

अजित पवार हे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाल्यासारखी स्थिती आहे. एवढेच नाही तर दोन्ही गटांचे सोशल मीडिया अकाउंटदेखील वेगवेगळे आहेत. 'NCP Speaks' या नावाने शरद पवार गटाचे अधिकृत ट्विटर अकाउंट आहे, तर मागील दोन दिवसांपासून अजितदादा गटाचे अकाउंट मात्र सस्पेंड करण्यात आले आहे. 'NCP Speak1' अशा नावाने अजितदादा गट यांचे ट्विटर अकाउंट होते. नियमांचा भंग आणि नाम साधर्म्यामुळे ट्विटरने ही कारवाई केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ट्विटर आज सुरू होईल : अजितदादा गटाचे स्पष्टीकरण

'NCP Speake' अशा एकाच नावाने दोन अकाउंट होते. यामुळे शरद पवार गटाने याबाबत तक्रार केल्यामुळे अकाउंट निलंबित करण्यात आले. यानंतर आता अजितदादा गटाकडून याबाबत ट्विटरशी संवाद साधला असून, आजच अकाउंट सुरू होईल, अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली.

(Edited By - Chetan Zadpe)

Ajit Pawar Twitter Account
Madhya Pradesh Election : 'ज्या ४० जागांवर हरलो, तिथे विजय मिळवायचाच' ; भाजपने बांधला चंग !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in