विधिमंडळानं कळवलं नाही पण आमचं ठरलंय! भाजपच्या 12 आमदारांची 9 महिन्यांनी होणार एंट्री

निलंबन रद्द झालेले भाजपचे 12 आमदार अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विधिमंडळात येणार आहेत.
Assembly Session
Assembly SessionSarkarnama

मुंबई : विधिमंडळ अधिवेशनात (Assembly Session) गोंधळ घालून तालिकाध्यक्षांना शिवीगाळ केल्याने भाजपच्या (BJP) 12 आमदारांचे निलंबन झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने निलंबन रद्द केल्याने हे आमदार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून उद्या (ता.3) विधिमंडळात येणार आहेत. या आमदारांना विधिमंडळाने काहीही कळवलेले नाही. तरीही अधिवेशनाला हजेरी लावण्याच्या भूमिका या आमदारांनी घेतल्याने उद्या मोठा गदारोळ उडण्याची चिन्हे आहेत.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसींच्या मुद्यावरून सरकारविरोधात आक्रमक झालेल्या विरोधी बाकांवरील भाजपने सभागृहात गोंधळ घालून सरकारची कोंडी केली. या गोंधळात सत्ताधारी विरोधक सभागृहात आमने-सामने आले. त्यावेळी तालिकाध्यक्ष भास्कर जाधव यांना त्यांच्या दालनात जाऊन शिवीगाळ केल्याचा प्रकार घडल्याने १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे या आमदारांना विधिमंडळाच्या आवारात येण्यास बंदी होती. सरकारच्या निर्णयाला आव्हान देत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने हे निलंबन रद्द ठरवले. यामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.

Assembly Session
मोठी घडामोड : दिशाच्या मृत्यूचे पुरावे नितेश राणे थेट न्यायालयात सादर करणार

विधिमंडळाच्या कामकाजात न्यायालयाला हस्तक्षेप करता येत नसल्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने मांडली आहे. त्यामुळे हे १२ आमदार विधिमंडळात येणार का, याची उत्सुकता आहे. हेच आमदार आता उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेनाला हजेरी लावणार आहेत. हे आमदार आपल्यावरील कारवाईचा वचपा काढण्यासाठी सरकारविरोधात आणखी ताकदीने लढणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अधिवेशनात सुरवातीपासूनच ठाकरे सरकार विरुद्ध भाजप असा संघर्ष होणार असल्याचे स्पष्ट आहे.

Assembly Session
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का

निलंबन रद्द झाल्याने अधिवेशनाला येणार आहोत. आता कोणी अडविण्याचा प्रश्न नसल्याचे भाजपचे आमदार राम सातपुते यांचे म्हणणे आहे. न्यायालयाचा आदेश आमच्याकडे आहे. त्यामुळे अधिवेशनाला जाणारच आहोत. मात्र कोणतेही पत्र आले नाही आणि ते येण्याचा प्रश्न नाही. न्यायालयाच्या निर्णयापुढे काही नसते, असे आमदार आशीष शेलार यांनी स्पष्ट केले आहे. ठाकरे सरकारवर नेहमीच आगपाखड करणाऱ्या या डझनभर आमदारांकडे या अधिवेशनात आता राष्ट्रवादी नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीचा कार्यक्रम सोपविल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे निलंबनाच्या मुद्यावरून सरस ठरलेले हे आमदार महाविकास आघाडी सरकारसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहे.

पावसाळी अधिवेशनात निलंबित झालेले भाजपचे १२ आमदार कोण?

1. आमदार अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व विधानसभा)

2. आमदार राम सातपुते (माळशिरस विधानसभा)

3. आमदार आशिष शेलार (वांद्रे पश्चिम विधानसभा)

4. आमदार संजय कुटे (जळगाव जामोद विधानसभा)

5. आमदार योगेश सागर (चारकोप विधानसभा)

6. आमदार किर्तीकुमार बागडिया (चिमूर विधानसभा)

7. आमदार गिरीश महाजन (जामनेर विधानसभा)

8. आमदार जयकुमार रावल (सिंदखेडा विधानसभा)

9. आमदार अभिमन्यू पवार (औसा विधानसभा)

10. आमदार पराग अळवणी (विले पार्ले विधानसभा)

11. आमदार नारायण कुचे (बदनापूर विधानसभा)

12. आमदार हरीश पिंपळे (मूर्तिजापूर विधानसभा)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in