शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांच्या गाडीवर कोसळले झाड

ज्या वेळी ही घटना घडली, त्यावेळी गाडीत कोणीही नव्हते.
शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांच्या गाडीवर कोसळले झाड
Omraje NimabalkarSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimabalkar) यांच्या गाडीवर मुंबईत भले मोठे झाड कोसळले आहे. ज्या वेळी ही घटना घडली, त्यावेळी गाडीत कोणीही नव्हते, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, खासदारांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Tree fell on the car of Shiv Sena MP Omraje Nimabalkar)

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. या वादळी पावसामुळे नुकसान आणि वीज पडून जीवितहानी झाल्याचे वृत्तही अनेक ठिकाणांहून येत आहे. मुंबईत शनिवारी आणि रविवारी सकाळी जोरदार वादळी पाऊस झाला. मुंबईतील तो यंदाच्या मोसमातील पहिलाच मोठा पाऊस होता. पहिल्याच पावसात अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडल्याचे वृत्त आहे.

Omraje Nimabalkar
‘...तर महाराष्ट्र काँग्रेस शरद पवारांसोबत असेल’

राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने खासदार ओमराजे निंबाळकर हे मुंबईत होते. पहिल्याच पावसात मुंबईतील ‘आमदार निवास’ समोरील मोठे झाड उन्मळून पडले आहे. मुंबईमधील आकाशवाणी आमदार निवासाबाहेर खासदार निंबाळकर यांची गाडी होती. त्या गाडीवर या वादळी पावसात एक भले मोठे झाड उन्मळून पडले आहे. ज्या वेळी झाड हे गाडीवर पडले, त्यावेळी गाडीत कोणीही नव्हते, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, निंबाळकर यांच्या गाडीचे मात्र मोठे नुकसान झालेले आहे.

Omraje Nimabalkar
पंकजा आमची मुलगीच, त्यांची काळजी घेण्यास भाजप समर्थ ; चंद्रकांतदादांचे राऊतांना प्रत्त्युतर

दरम्यान, ओमराजे निंबाळकर हे २०१९ च्या निवडणुकीत उस्मानाबादचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर ही निवडणूक जिंकली आहे. त्या अगोदर २००९ मध्ये ते उस्मानाबादचे आमदार होते. त्यांची राजकीय लढाई ही प्रामुख्याने पद्‌मसिंह पाटील आणि त्यांचे सुपुत्र राणाजगजितसिंह पाटील यांच्याविरोधात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in