एसटीचे वातावरण खराब करणाऱ्यांना सोडणार नाही; अनिल परबांचा इशारा

अनेक कर्मचारी अजूनही संपाची भाषा करताना दिसत आहे.
एसटीचे वातावरण खराब करणाऱ्यांना सोडणार नाही; अनिल परबांचा इशारा
Anil ParabSarkarnama

मुंबई : न्यायालयाच्या आदेशानंतर संपकरी कर्मचारी एसटीच्या (ST workers) सेवेत हजर झाले. मात्र कर्मचाऱ्यांमध्ये गटतट पडले आहेत. प्रस्थापीत एसटी संघटना, ऍड. गुणरत्न सदावर्ते (Gunratan Sadavarte) समर्थक आणि भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) समर्थकांकडून आगार पातळीवर कर्मचाऱ्यांना भडकावून पुन्हा संप पुकारण्याची फुस लावली जात आहे. या पार्श्वभूमीवर एसटीतील वातावरण खराब करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिला आहे.

Anil Parab
'भाजपने राज ठाकरेंचा टप्प्यात कार्यक्रम केला!'

एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी बुधवारी (ता.4 मे) विभाग नियंत्रकांची बैठक घेऊन एसटी सेवा प्रभावीपणे सोडण्याच्या सूचना दिल्या. तोट्यात असलेली एसटी सेवा पुन्हा प्रवाहात कशी आणता येईल यावरही या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्या, शिवाय ईटीआयएम मशीनमुळे वाहकांना उद्भवणाऱ्या समस्यांवरही तोडगा काढण्यासंदर्भात सर्व विभाग नियंत्रकांनी आपले मत मांडल्याचे सूत्रांनी सांगितले. एसटी पूर्णक्षमतेने सुरू करण्याचा प्रयत्न एसटीचे व्यवस्थापकीय संचालक चन्ने यांचा आहे.

मात्र, दुसरीकडे संपावरून कर्तव्यावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये कर्तव्याबद्दल अजूनही सकारात्मक नसल्याचे दिसून येत आहे. अनेक कर्मचारी अजूनही संपाची भाषा करताना दिसत आहे. अनेक कर्मचारी अजूनही पडळकर, खोत आणि सदावर्ते यांच्या संपर्कात असल्याचे कळते. यावेळी अशा कर्मचाऱ्यांना सोडायचे नाही, असा ठाम विचार परिवहन मंत्र्याचा आहे.

Anil Parab
दहावी, बारावीत अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार हेलिकॉप्टरची मोफत राईड

दरम्यान, परब यांनी आज विभाग पातळीवरील आढावा घेतली घेतली. शुक्रवारी विभाग नियंत्रकांची तातडीने बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामध्ये सर्व माहिती घेऊन त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. महामंडळातील अंतर्गत वातावरण खराब करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार, असे परब यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.