Eknath Shinde : मर्जीतील अधिकाऱ्यांना झुकते माप ; 'मातोश्री' जवळचे 'वेटिंग' वर

Eknath Shinde | जे अधिकारी 'मातोश्री'जवळचे आहेत ते 'वेटिंग'आहेत.
Eknath Shinde,uddhav thackeray
Eknath Shinde,uddhav thackeraysarkarnama

मुंबई : सत्ता बदलली की प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा विषय चर्चेत येतो, सत्ताधारी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना झुकते माप देतात. त्यांची बदली आपल्या विभागात करुन घेतात. सध्या सनदी (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा शिंदे सरकारनं (eknath shinde) लावला असल्याचे चित्र आहे. जे अधिकारी 'मातोश्री'जवळचे आहेत ते 'वेटिंग'आहेत. (Eknath Shinde latest news)

IAS अधिकारी अश्विनी भिडे यांची शिंदे सरकारने 'मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन'च्या व्यवस्थापकीय संचालकपदी नुकतीच नियुक्ती केली आहे. त्या मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत होत्या.

'मेट्र्रो व्हूमन' म्हणून ओळख असलेल्या अश्विनी भिडे, आरेमधील झाडं मेट्रो कारशेडसाठी तोडल्यानंतर चर्चेत आल्या होत्या. उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेताच त्यांची बदली केली होती.

महिन्याभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर या नव्या सरकारनं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या निकटवर्तीय असलेल्या अधिकाऱ्यांची बदल्या करण्यात सुरवात केली आहे.

Eknath Shinde,uddhav thackeray
मिस्टर फडणवीस, आमच्या लाऊडस्पीकरसमोर तुमच्या पिपाण्या टिकणार नाहीत !

अश्विनी भिडे, भाऊसाहेब दांडगे या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या शिंदे सरकारकडून करण्यात आल्या. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दांडगे यांची कल्याण-डोंबिवली महापलिकेच्या आयुक्तपदी, तर मुख्याधिकारी अजीज शेख यांची उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली. साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची बदली करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जाणारे पंतप्रधान कार्यालयातील अनुभव असलेले सनदी अधिकारी श्रीकर परदेशी यांची फडणवीसांच्या कार्यालयाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिक महापालिकेचे आयुक्त रमेश पवार, औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांची नव्या सरकारनं बदली केली आहे. त्यांना नियुक्ती दिली नाही. पवार व पांडेय हे मातोश्रीच्या जवळचे मानले जातात. त्यामुळेच त्यांना वेटिंगवर ठेवल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in