IPS Officer Transfer : राज्यातील 11 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणत्या अधिकाऱ्याची बदली कुठे?

Maharashtra : कोणत्या अधिकाऱ्याची बदली कुठे झाली?
IPS Officer Transfer
IPS Officer TransferSarkarnama

IPS Transfer : राज्यातील काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबदचा आदेश आज गृह विभागाने काढला आहे.

यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या आठ आयपीएस अधिकाऱ्यांना आता पोस्टिंग मिळाली आहे. यामध्ये राज्यातील एकूण 11 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह मंत्रालयाने जारी केले.

कोणत्या अधिकाऱ्याची बदली कुठे?

- आयपीएस बिपिन कुमार सिंह यांची मुंबई येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या अपर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आयपीएस प्रभात कुमार यांची अपर पोलीस महासंचालक व उपमहासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र, मंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

- विनीत अग्रवाल यांची अपर पोलीस महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारी, म्हाडा, मंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राजकुमार व्हटकर यांची विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र, मंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

IPS Officer Transfer
Imtiaz Jalil News : बाळासाहेब ठाकरेंना राजकीय दुकान चालवायचे होते, म्हणून शहराचे नाव बदलले..

- जय जाधव यांची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी मंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कैसर खालिद यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, मोटार परिवहन विभाग, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

- डी. के. पाटील भुजबळ यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच एस.एच. महावरकर यांची नांदेड विभागाच्या पोलीस उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

IPS Officer Transfer
Ajit Pawar On By Election Result : पुण्यातील पोटनिवडणूक निकालाबाबत अजितदादांचे सूचक विधान अन्‌ सत्ताधाऱ्यांना दिला इशारा

- अभिजीत शिवथरे यांची कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहायक पोलीस महानिरीक्षकपदी मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

- तसेच पौर्णिमा चौगुले यांची मीरा-भाईंदर-वसई-विरारच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राहुल खाडे यांची बदली जालना जिल्ह्याच्या अपर पोलीस अधिक्षकपदी करण्यात आली आहे.

- नीवा जैन यांची अपर निवासी आयुक्त, सचिव व निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन, यांचे कार्यालय, नवी दिल्ली येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com