MVA vs BJP and Shivsena : राज्यात गद्दारीला स्थान नाही; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

Maharashtra Politics : लोकसभा, विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांतही यशाचा दावा
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama

Aditya Thackeray : राज्यात सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्त महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना अशी लढाई सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान २५३ पैकी १४७ बाजार समित्यांसाठी शुक्रवारी (ता. २८) मतदान होऊन शनिवारी (ता. २९) निकाल स्पष्ट झाला. तर उर्वरित ८८ बाजार समितींसाठी रविवारी (ता. ३०) मतदान होऊन निकाल लागणार आहे. आतापर्यंत २५६ पैकी १६० बाजार समित्यांचा निकाल स्पष्ट झाला आहे. त्यातील ९० बाजार समित्यांवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. त्यामुळे राज्याचा कल सत्ताधाऱ्यांविरोधात असल्याची टीका महाविकास आघाडीतील नेत्यांनी केली आहे.

Aditya Thackeray
Yavatmal APMC Election Results : आठ बाजार समित्यांची मतमोजणी सुरू, कल आघाडीकडे !

या बाजार समित्यांच्या (APMC) निवडणुकीत ९० ठिकाणी महाविकास आघाडी (MVA) तर ५१ ठिकाणी भाजप-शिवसेनेने सत्ता राखली आहे. यात निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच इतर बाजार समित्यांवरही आपलीच सत्ता येणार असल्याचा दावाही या नेत्यांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमिवर ठाकरे गटाचे आमदार माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पुन्हा सत्ताधारी शिवसेनेला डिवचलं आहे.

Aditya Thackeray
Karnataka Election : मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती कुणाला? कानडी जनतेचा कौल काय?

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधानपरिषेच्या निवडणुका झाल्या. तसेच काही ठिकाणी पोटनिवडणुका पार पडल्या. या निवडणुकांत महाविकास आघाडीने यश मिळविलेले आहे. त्यानंतर होत असलेल्या राज्यातील बाजार समित्यांवरही महाविकास आघाडीने सत्ता राखली आहे. आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही आमचाच विजय होणार, असा विश्वास काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील सर्व नेते करीत आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री Shivsena शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपवर निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.

Aditya Thackeray
Nitesh Rane vs Sanjay Raut: ''2019 ला संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं; पण ठाकरेंनी...; राणेंचा मोठा गौप्यस्फोट

आदित्य ठाकेर म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीला दणदणीत यश प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राने पुनश्च दाखवले की येथे गद्दारीला स्थान नाही. हेच आपल्याला येत्या लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिसणार आहे." या ट्विटद्वारे आदित्य ठाकरे यांनी आगामी निवडणुकांतही महाविकास आघडीला घवघवीत यश मिळणार असल्याचा दावा केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com