
मुंबई : सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या कंपनीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnike) यांचे निकटवर्तीय अमित चांदोले (Amit Chandole) आणि टॉप्स सिक्युरीटीचे माजी संचालक शशिधरन यांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
त्यांनी याबाबत न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जाची दखल न्यायालयाने घेतली असू ईडीला उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई सत्र न्यायालयाकडून ईडीला 21 सप्टेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय आणि सरनाईक परिवाराच्या कंपन्यामध्ये महत्त्वाच्या पदावर असलेले अमित चांदोले यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (MMRDA) कोट्यावधी रुपयांचा चूना लावल्याचा आरोप झाला आहे.
अमित चांदोले कोट्यावधींचे गैरव्यवहार करत होते? त्यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे? त्यांनी MMDRA ची देखील फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. टॉप्स सिक्युरीटीचे सर्वेसर्वा राहूल नंदा यांच्यासाठी देखील चांदोले हेच MMRDA मध्ये एजंट म्हणून काम पाहात होते. राहूल नंदा आणि चांदोले भेट कोणी करुन दिली? राहूल नंदांसोबत लंडनमध्ये कोणी पैसे गुंतवले होते? असे अनेक प्रश्न ईडीनं उपस्थित केले आहेत.
मूळ प्रकरणात ईओडब्ल्यूनं सादर केलेला 'सी समरी' रिपोर्ट दंडाधिकारी कोर्टानं स्वीकारला. त्यामुळे आता ईडीनं दाखल करून घेतलेल्या प्रकरणाला अर्थ उरत नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयानं पीएमएलए संदर्भात नुकत्याच दिलेल्या निकालाच्या आधारावर याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या याच निकालानुसार मुंबई सत्र न्यायालयानं नुकतीच ओमकार ग्रुपच्या दोन विकासकांची निर्दोष मुक्तता केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.