अशा परिस्थितीत तो 'कार्यक्रम' प्रत्यक्षात येणं फार अवघड! राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र

मनसेचा उद्या होणार मेळावा रद्द करण्यात आला आहे.
Raj Thackeray Latest Marathi News
Raj Thackeray Latest Marathi Newssarkarnama

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी राज्यभरातील कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं आहे. मनसेच्या बुधवारी (ता. 13) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राज ठाकरे यांच्याकडून राज्यभरातील कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला जाणार होतो. ते कार्यकर्त्यांना महत्वाचा कार्यक्रम देणार होते. पण राज्यभरातील पुरस्थितीमुळे हा कार्यक्रम राबविणे अवघड असल्याचे ठाकरे यांनीच स्पष्ट केलं आहे. (Raj Thackeray Latest News)

राज्यातील पावसामुळे हा मेळावा रद्द करण्यात आल्याचे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात जाहीर करण्यात आलं आहे. हे पत्र मनसेकडून ट्विटरवर प्रसिध्द केले असून कार्यकर्त्यांना पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केलं आहे. आपण वास्तविक उद्या एक मेळावा आयोजित केला होता. ज्यात मला तुमच्याशी बोलायचं होतं आणि कामासंबंधी काही सूचना करायच्या होत्या. परंतु कालपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसानं थैमान घातलेलं दिसत आहे. जनजीवन तर विस्कळीत आहेच, परंतु अशा परिस्थितीत मी उद्या जो कार्यक्रम तुम्हा सर्वांना सांगणार होतो तो सांगितला तरी तो प्रत्यक्षात आणता येणं फार अवघड आहे, असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

Raj Thackeray Latest Marathi News
मोठी घडामोड : रवींद्र फाटक अन् राजेश शहा यांची शिवसेनेतून हकालपट्टी

अशा परिस्थितीत आपण उद्याचा मेळावा पुढे ढकलत आहोत. पुढची तारीख आणि वेळ लवकरच, थोडा पावसाचा अंदाज घेऊन कळवली जाईल. दरम्यान, तुम्ही स्वत:ची तर काळजी घ्याच परंतु अतिवृष्टीमुळे जिथे लोकांना त्रास होतो आहे. तिथेही तुम्ही लोकांसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा, असं आवाहन राज यांनी केलं आहे.

मुख्यत: नदीकाठाला जिथे लोक रहात आहेत तिथल्या घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. सांगली-कोल्हापूरकडचा आत्ता-आत्ताचा पूर तुम्हाला आठवतोय ना? काही लोकांना तात्पुरत्या निवासात हलवायला लागू शकतं. तिथे अन्नधान्य, पिण्याचं शुध्द पाणी, अंथरूण-पांघरूण पुरवावं लागेल. मुख्यत: वृध्द, गरोदर महिला, अपंग आणि लहान मुलं ह्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. झाडं उन्मळून पडतात, ती नंतर पुन्हा लावावी लागतील, असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.

एक लक्षात घ्या, की अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा प्रचंड कामात असतात त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण ताण येईल असं काहीही करू नका. अर्था, असं काही होऊ नये, कुठलंही नैसर्गिक संकट येऊ नये, हीच आपील इच्छा आहे, फक्त सतर्कतेसाठी सांगितलं, असं ठाकरे यांनी निवेदनातून सांगितलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in