Farmers March : आजची बैठक सकारात्मक, पण आंदोलनातून आत्तातरी माघार नाही; अजित नवलेंचे स्पष्टीकरण

Farmers Long March : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाबरोबर आज बैठक पार पडली.
Farmers Long March
Farmers Long March Sarkarnama

शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या शिंदे- फडणवीस सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे नाशिकवरून मुंबईच्या दिशेने काढण्यात आलेल्या शेतकरी लाँग मार्चला मोठं यश आलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाबरोबर आज महत्वाची बैठक पार पडली. यानंतर या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Farmers Long March
Pension : खासदार धानोरकर म्हणाले, ‘त्या’ माजी खासदारांचे पेन्शन बंद करा !

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे शेतकरी आपला मोर्चा उद्या (दि.17 मार्च) मागे घेणार असल्याचं आमदार विनोद निकोले यांनी म्हटलं आहे.

मात्र, याबबातची माहिती देताना शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत गेलेल्या काही नेत्यांची सांगितलं की, सरकार सोबत सकारात्मक चर्चा झाली. पण मोर्चा लगेच मागे घेणार नाही, असं सांगितलं.

तसेच सरकारची आजची बैठक सकारात्मक झाली आहे. पण आंदोलनातून आत्तातरी माघार नाही, असं स्पष्टीकरणही अजित नवले यांनी दिलं.

Farmers Long March
Accident : अपघात प्रवण स्थळ नव्हे, ‘आमदार हरीष पिंपळे ॲक्सीडेंट स्पॉट’; वंचित आक्रमक !

मोर्चा आहे तिथेच थांबवला जाईल. सरकारने घेतलेल्या निर्णयाची जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना अंमलबजावणीचे आदेश पारित केल्यानंतर मोर्चाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत उद्या (दि.17 मार्च) विधिमंडळात निवेदन देण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच हा मोर्चा मागे घेण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in