Maharashtra Political Crises| महत्त्वाचे निर्देश देत न्यायालयाने आजची सुनावणीही पुढे ढकलली

Maharashtra Political Crises| न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर आजची सुनावणी पार पडली.
Uddhav Thackeray News, CM Eknath Shinde News, Supreme Court News
Uddhav Thackeray News, CM Eknath Shinde News, Supreme Court NewsSarkarnama

Maharashtra Political Crises| नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी सुरु झाली. पण न्यायाधीशांनी सुनावणी सुरु होताच दोन्ही बाजूंना काही महत्त्वाचे निर्देश दिले आणि पुढील सुनावणी चार आठवड्यांनी घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता ही सुनावणी २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

न्यायाधीश चंद्रचूड यांनी, दोन्ही बाजूंच्या वकीलांनी समोरासमोर बसा बैठक घ्या. कुठल्या मुद्द्यावर कोण युक्तीवाद करणार हेही आपसात ठरवा. दोन दोन वकीलांनी कागदपत्रे बनवा, गोषवारा तयार करा आणि दोन्ही गटांनी कागदपत्रांचा गोषवारा सादर करा, असे आदेश न्यायाधीश चंद्रचुड यांनी दिले आहेत.

Uddhav Thackeray News, CM Eknath Shinde News, Supreme Court News
आमदार किशोर पाटील देणार हजार तरुणांना रोजगार देणार!

तसेच, पुराव्यांची यादीही सादर करण्यासाठी आणि दोन्ही गटांना आपली लेखी बाजू मांडण्यासाठी न्यायालयाने पुढील चार आठवड्यांचा वेळ दिला आहे. म्हणजेच आज न्यायालयाने कोणताही युक्तीवाद ऐकून न घेता. दोन्ही गटांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, दिवाळी आणि इतर सुट्ट्यांमुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये ही सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासंबंधी दाखल करण्यात आलेल्या वेगवेगळ्या याचिकांवर आज सुनावणी होणार होती. पण आज होणारी सुनावणी आता चार आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे.

शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या वैधतेला आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आणि सुनील प्रभू यांनी आव्हान दिले होते. तसेच सुनील प्रभू यांनी भरत गोगावले यांच्या मुख्य प्रतोदपदी केलेल्या नियुक्तीलाही विरोध केला आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या या आमदारांना अपात्र ठरविण्याची त्यांची मागणी त्यांनी याचिकेतून केली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदावरून झालेल्या हकालपट्टीच्या मुद्द्यावरुन आव्हान दिले आहे. या वेगवेगळ्या प्रकरणांवरील पाच-सहा याचिकांवर आज घटनापीठापुढे सुनावणी होणार होती. पण न्यायालयाने ही सुनावणी आता चार आठवडे पुढे ढकलली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in