भवानी तलवारीनंतर अफजलखानाचा कोथळा काढलेले वाघनखे महाराष्ट्रात येणार

Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

Sudhir Mungantiwar News : छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले वाघ नखं महाराष्ट्रात आणण्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली आहे. त्यामुळे आता भवानी तलवारी पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे राज्यात आणण्यात येणार आहेत.

ही वाघ नखं महाराष्ट्राला (Maharashtra) मिळावेत यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याशी महाराष्ट्र सरकार चर्चा करत असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. मुनगंटीवार म्हणाले, ''शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याआधी वाघ नखं राज्यात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं हे सध्या ब्रिटनमध्ये आहेत. तर याआधीही शिवरायांची भवानी तलवार आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले'', असं मुनगंटीवारांनी सांगितलं.

Sudhir Mungantiwar
सातारा पालिका घरपट्टी आकारणी प्रक्रिया स्‍थगित करा : शिवेंद्रसिंहराजे

''छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाला २०२४ साली ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ६ जून २०२४ हा दिवस संकल्प आणि शपथ दिवस ठरणार आहे. तर आपल्या राज्यात गुजरातच्या सरदार वल्लभभाई पटेल या संग्रहालयाच्या पार्श्वभूमीवर ३० एकरमध्ये संग्रहालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे'', असं मुनगंटीवार यांनी सांगितलं. (Shivaji Maharaj Wagh Nakhe News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com