मोठी बातमी : राऊतांनी संशय घेतलेले तीनही आमदार राष्ट्रवादीच्या बैठकीला

विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) राष्ट्रवादीची बैठक पार पडली...
Sanjay Raut-Sanjay shinde-Devendra Bhuyar-Shyamasunder Shinde
Sanjay Raut-Sanjay shinde-Devendra Bhuyar-Shyamasunder ShindeSarkarnama

मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रावादी काॅंग्रेसने (MLC election 2022) आज हाॅटेल ट्रायडेंटमध्ये आपल्या आमदारांची बैठक घेतली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह जयंत पाटील (Jayant Patil), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आदी वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. राष्ट्रवादीचे सर्वच आमदार या बैठकीला उपस्थित नव्हते. पण राष्ट्रवादीला पाठिंबा दिलेले तीन आमदार आवर्जून या वेळी हजर होते.

Sanjay Raut-Sanjay shinde-Devendra Bhuyar-Shyamasunder Shinde
मोठी बातमी : आमदार रवि राणांविरोधात अटक वॉरंट; विधान परिषद निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का?

आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde), देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) आणि श्यामसुंदर शिंदे (Shyamsunder Shinde) या तिघांची उपस्थिती आज महत्वाची ठरली. कारण राज्यसभा निवडणुकीत या तिघांची मते फुटल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या तिघांनीही तेव्हा आपण महाविकास आघाडीलाच मतदान केल्याचा दावा केला होता. राऊतांच्या आरोपांवर या तिघांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत आम्हाला वेगळी भूमिका घ्यायला भाग पाडू नका, असा इशारा त्यांनी दिला होता. आजच्या बैठकीनंतर तरी ते राष्ट्रवादी सोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. य़ामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार सहजपणे निवडून येण्याचा मार्ग खुला झाला आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोघांना उच्च न्यायालयाने मतदानाचा अधिकार नाकारल्याने राष्ट्रवादीची मतदारसंख्या ही ५१ वर आली होती. आता हे तीन अपक्ष आमदार पक्षासोबत असल्याचे स्पष्ट झाल्याने ही संख्या पुन्हा ५४ झाली आहे. त्यामुळे २७ चा कोटा आला तर राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे सहज निवडून येतील.

Sanjay Raut-Sanjay shinde-Devendra Bhuyar-Shyamasunder Shinde
शिवसेना हाय अलर्टवर : मतदानात चूक अथवा दगाफटका केल्यास आमदारांवर कडक कारवाई

राष्ट्रवादीच्या आमदारांना आपण एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे शरद पवार यांनी या वेळी सांगितले. अजित पवार यांनीही पक्षाचे दोन्ही उमेदवार निवडून येण्यासाठीचे धोरण ठरल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पक्षाचे प्रतोद अनिल पाटील यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसला पाठिंबा दिलेले तीनही आमदार आमच्यासोबत असल्याचे सांगितले. रविवारी दुपारी दोननंतर अजित पवार आणि जयंत पाटील हे प्रत्येक आमदाराशी स्वतंत्रपणे बोलणार आहेत. त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. तसेच मतदान कसे करायचे याचे मार्गदर्शन हे आमदारांना करणार आहेत.

दुसरीकडे शिवसेना आणि काॅंग्रेस यांच्याही आमदारांच्या हाॅटेलमध्ये बैठका झाल्या. शिवसेना आमदारांची पवईतील रेनिसान्समध्ये तर काॅंग्रेस आमदारांच्या फोर पाॅइंटसमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. या दोन्ही पक्षांचे नेते आमदारांचा रविवारी क्लास घेणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com