उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी करा, म्हणणाऱ्या गौरी भिडेंच्या जीवाला धोका : राणेंचा गंभीर आरोप!

Gauri Bhide : सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियन आणि मनसुख हिरेन या तीन व्यक्तींच्या मृत्यूचा उल्लेख
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बेहिशोबी मालमत्ता विरोधात गौरी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या मालमत्ता विरोधात उच्च न्यायालयात ही याचिका दाखल आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. आता भाजप नेते व आमदार नितेश राणे यांनी भिडे यांचा उल्लेख करत एक ट्विट करत अप्रत्यक्षपणे शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटूंबियांच्या संपत्तीची चौकशी करणाऱ्या गौरी भिडे यांना संरक्षण देण्याची मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे.ठाकरे यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका गौरी भिडे यांनी उच्च न्यायालयात केली आहे. यामुळे भिडे यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे राणे यांनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या मालमत्ता विरोधातील याचिकेवर आज सुनावणी!

नितेश राणे यांनी या ट्विट मध्ये सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियन आणि मनसुख हिरेन या तीन व्यक्तींच्या मृत्यूचा उल्लेखही केला आहे. दरम्यान या तिन्ही मृत्यूंवरून राणे आणि विरोधकांकडून शिवसेना, शिवसेना नेते आदित्य ठाकरे व इतरही नेत्यांवर याआधीही गंभीर आरोप झालेले आहेत. त्यामुळे गौरी भिडे यांच्या संरक्षणावरून आता नवा राजकीय वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

राणेंच्या या ट्विटनंतर आता शिवसेना आणि राणे यांच्यात पुन्हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. यावर शिवसेनेची कोणतीही प्रतिक्रीया अजूनही आलेली नाही. मात्र यावर युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com