Congress Working Committee : काँग्रेस वर्किंग कमिटीत थोरात-चव्हाणांना डावललं : 'हे' आहे कारण

Maharashtra Congress Politics : काँग्रेस पक्षाची 39 सदस्यांची केंद्रीय कार्यकारिणी काल (20 ऑगस्ट) राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी घोषित केली.
Balasaheb Thorat | Prithviraj Chavan
Balasaheb Thorat | Prithviraj ChavanSarkarnama

राजेंद्र त्रिमुखे

Nagar Politics : काँग्रेस पक्षाची 39 सदस्यांची केंद्रीय कार्यकारिणी काल (20 ऑगस्ट) राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी घोषित केली. या नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील तब्बल 8 नेत्यांचा समावेश असून यात चार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. मात्र काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी घेतलेली भूमिका, ही बाळासाहेब थोरात यांना केंद्रीय कार्यकारिणीत संधी न मिळण्यामागचे कारण आहे. नाशिकच्या पदवीधर निवडणुकीत डॉ. सुधीर तांबे यांनी पक्षाचा एबी फॉर्म असताना उमेदवारी अर्ज दाखल न करणे आणि भाचे सत्यजित तांबे यांनी अपक्ष निवडणूक लढवणे याचा परिणाम म्हणून थोरातांना डावलल्याची चर्चा माध्यमातून आहे. मात्र आता यावर थोरातांच्या वर्तुळातून याबाबत प्रतिक्रिया येत असून पुन्हा निवड न होण्यामागे पक्षीय संकेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Balasaheb Thorat | Prithviraj Chavan
Onion Political Role : गल्ली ते दिल्ली, सर्वच राजकारण्यांचा कांद्यानं केला वांदा ! आतापर्यंत कुणाकुणाला रडवलं...

याबाबत सचिन गुंजाळ यांनी एक ट्विट करत उलटसुलट चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. "आज जाहीर झालेल्या काँग्रेस वर्किंग कमिटी मध्ये मुख्यमंत्री किंवा विधिमंडळ पक्षनेते यांचा समावेश नाही. काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या सब्जेक्ट कमिटीचे मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षनेते आणि प्रदेशाध्यक्ष हे सदस्य असतातच. काँग्रेस वर्किंग कमिटी मध्ये मुख्यमंत्री किंवा विधिमंडळ पक्ष नेते नसतात, हा साधारण संकेत आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची नुकतीच विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी फेरनियुक्ती झाली आहे." असं ट्विट करत सचिन गुंजाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, "बाळासाहेब थोरात यांच्या तथाकथित हितचिंतकांसाठी ही माहिती देत आहे." विशेष म्हणजे, आ.सत्यजित तांबे यांनीदेखील सचिन गुंजाळ यांचे ट्विट री-पोस्ट केले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in