बारावीचा निकाल लागला; कोकण टॉपवर, तर मुंबई तळाला

HSC Result 2022 | Kokan news| यावर्षीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली असून 95.35 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
HSC Result 2022 |
HSC Result 2022 |

HSC Result 2022 latest news

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर झाला असून यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. बोर्डाने निकालाची आकडेवारी जाहीर केली असून राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजे 97.22 टक्के निकाल लागला आहे. तर मुंबई विभागाचा सर्वात कमी म्हणजे 90.91 टक्के निकाल लागला आहे.

यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 95.24 टक्के इतका लागला आहे. आज दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

HSC Result 2022 |
युपीत मराठी भाषा शिकवण्याची मागणी; संदिप देशपांडे म्हणतात, आमचा विरोध नाही पण...

विभागनिहाय निकाल
कोकण - 97.22 टक्के पुणे - 93.61 टक्के
कोल्हापूर - 95.07 टक्के, अमरावती - 96.34 टक्के
नागपूर - 96.52 टक्के, लातूर - 95. 25 टक्के
मुंबई - 90.91 टक्के, नाशिक - 95.03 टक्के
औरंगाबाद - 94.97 टक्के

दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली असून 95.35 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 93.29 टक्के उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण आहे. गेल्यावर्षी 2021 मध्ये कोरोनामुळे बारावीची परीक्षा झाली नव्हती. अंतर्गत मुल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले होते. तर फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 90.66 टक्के लागला होता. तर यावर्षीचा निकाल 94.22 टक्के आहे. म्हणजे मागील वेळेपेक्षा यावर्षी बारावीचा निकाल 3.56 टक्क्यांनी वाढला आहे.

- ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी या अधिकृत संकेतस्थळांना भेटी द्या

http://mahresult.nic.in

http://hscresult.mkcl.org

https://mahresults.org.in

https://lokmat.news18.com

https://indiatoday.in/education-today/results

https://mh12.abpmajha.com

https://tv9marathi.com/board-result-resgistration-for-result-marksheet-12th

महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईट maharesult.nic.in किंवा hscresult.mkcl.org किंवा msbshse.co.in वर जा.

होमपेजवर, MSBSHSE १२वी निकाल २०२२ या लिंकला क्लिक करा

तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख एंटर करा, कॅप्चा टाका आणि सबमिट वर क्लिक करा

तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल, तुम्ही खाली डाउनलोड करून डेस्कटॉपवर सेव्ह करू शकता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com