Tata Airbus Project : हे तर मिंधे सरकारचं पाप! देसाईंनी तोफ डागली...

Tata Airbus Project : टाटा एअरबस हा प्रकल्प गुजरातला गेल्याने सध्या राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.
Tata Airbus Project | Subhash desai| CM Eknath Shinde
Tata Airbus Project | Subhash desai| CM Eknath Shinde

Tata Airbus Project मुंबई : 'फॉक्सकॉन-वेदांता'नंतर आता C-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट हा प्रकल्पही महाराष्ट्रातला प्रकल्प गुजरातला नेण्यात आला. नागपूर येथे होणारा C-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट हा प्रकल्प आता गुजरातमध्ये होणार आहे. गुजरातमधील वडोदरा येथे हा प्रकल्प होणार असून येत्या 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे.

टाटा एअरबस हा प्रकल्प गुजरातला गेल्याने सध्या राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. दरम्यान एअरक्राफ्टचा हा प्रकल्प नागपूरमध्येच होणार असल्याच असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलं होतं. 22 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी केंद्राकडे पाठपुरावा केल्याचंही ते म्हणाले होते. परंतु आता हा प्रकल्प गुजरातला होणार आहे. यावरुन माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिंदे -फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारमुळेच एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. प्रकल्प बाहेर जाऊनही राज्य सरकार मुग गिळुन गप्प बसले. गेल्या तीन महिन्यात हा तिसरा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेला. या तिनही प्रकल्पांची गुंतवणूक नेमकी कोणत्या राज्यात होणार या घोषणा झाल्या. पण गेल्या तीन महिन्यात राज्यात जे वेगळ सरकार स्थापन झालं आहे ते याबद्दल विरोध करणार नाही, मुग गिळून गप्प बसतील, एक शब्दही काढणार नाही, म्हणून असे प्रकल्प बाहेर नेण्यासाठी ही योग्य वेळ असल्याची खात्री केंद् सरकारला वाटत आहे. असे महाराष्ट्रात गुंतवणूक होणारे तीन मोठमोठे प्रकल्प धडाधड महाराष्ट्राबाहेर जातात. असा आरोप मंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे.

दरम्यान, हा प्रकल्प २०२१ ला महाविकास आघाडी सरकारच्या काळातच झाल्याने याचे पाप आमच्यावर ढकलू नका असा आरोप उद्योगमंत्री उद्य सामंत यांनी केला आहे. यावर बोलताना सुभाष देसाई म्हणाले की, आजच्या वर्तमान पत्रात महाराष्ट्रात येऊ घातलेली एअरबसची टाटा उद्योगाची २२ हजार कोटींची गुंतवणूक गुजरातमध्ये हलवण्यात येत आहे. ही तारीख हा काळ आम्ही नाही ठरवून दिलेला. महाविकास आघाडीचा यात कोणताही रोल नाही. हे केंद्र सरकार, गुजरात सरकार आणि याला मुक संमती देणारं आताच मिंधे सरकार. यांनी मिळून केलेलं हे पाप आहे, असा सणसणीत टोलाही सुभाष देसाई यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in